पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ गोखल्यांचे पत्र पहिल्याने प्रसिद्ध करा 8197 ५१ दाखवा. तोपर्यंत तुमचा पक्ष कच्चा, गुप्तघाताचा आणि उत्तर देण्यासहि अयोग्य आहे, असे कोणाहि समंजस मनुष्याचे मत झाल्यास त्यात ' केसरीगीते' कडे काही दोष नाही. ना. गोखल्यांचे पत्र अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. परंतु मौज अशी की, त्याचे समर्थन करताना 'टिळक सरकारास बहिष्कार टाकणारे आहेत ' हे सिद्ध करण्यास रा. टिळकांच्या एका भाषणाचा उल्लेख ज्ञानप्रकाशाने केला आहे ! पण आपण काय करतो हे या लेखकाच्या ध्यानात आले नाही. 'टिळक सरकाराला बहिष्कार घालणारे आहेत' हे सिद्ध कशासाठी करावयाचे १ ना. गोख- ल्यांच्या पत्रातील मजकूर सिद्ध करण्याकरिता. तर मग ना. गोखल्यांच्या पत्रात (Boycott of Gureruinent) हे शब्द होते म्हणावयाचे. आणि गोखले म्हणतात की, हे शब्द नव्हते. तेव्हा यापैकी खरा कोण ? लिहिणारा का समर्थन करणारा ? आम्हाला काही याचा निकाल होत नाही. करिता आपापसातील ही झटापट गुरु- शिष्यानीच सोडवून दाखवावी, अशी त्यास आमची विनंति आहे रा. टिळकावर आरोप सिद्ध करण्याकरिता ज्ञानप्रकाशकार १९०७ साली झालेल्या रा. टिळकांच्या एका भाषणाचा उल्लेख करितात. पण याच भाषणाचा कलकत्त्याच्या दुसऱ्या पत्रातून दुसऱ्या प्रकारचे रिपोर्ट आलेले आहेत, अर्थात् हा एकच रिपोर्ट विश्वस- नीय मानिता येत नाही, या गोष्टीवर ज्ञानाचा प्रकाश न पडता अज्ञानाच्या अंध- कारात ती गडप झालेली आहे. पण यावर दुसरे उत्तर असे आहे की, हे उतारे यापूर्वी गोखल्यास ठाऊक होते की नाही ? असले तर दोन वर्षापूर्वीच समेटाचे बोलणे त्यानी का केले ? रा. टिळक नव्हते म्हणून केले असे उत्तर कोणी देईल तर रा. टिळक आल्यावरही पुनः कॉन्स्टिट्यूशनमध्ये दुरुस्ती करण्याच्या ठरावाचा मसुदा बिझांटवाईस त्यानी का करून दिला ? यावर त्यांच्या एका इतिहासज्ञ मित्राने अशी कोटि लढविली आहे की, टिळकास शिक्षा झाल्यामुळे त्यांची मते बदलली असतील अशी गोखल्यांची समजूत होती. पण या महामूर्खाला असे कळले नाही की, पूर्ण विचारांती शास्त्रीयरीत्या बनलेली मनुष्याची मते बदलण्यास तुरुंग हे कधीच कारण होत नाही. निदान टिळक आणि गोखले यांचा आज पुष्कळ वर्षांचा जो परस्परांचा संबंध आहे त्यावरून त्यास तरी ही गोष्ट कळावयास पाहिजे होती हे निर्विवाद आहे. पण करतात काय १ समेटाचे बोलणे स्वतः उपस्थित करून काही कारणामुळे ते बदलण्याची वेळ आली तेव्हा मतात बदला- बदल झाल्याच्या जबाबदारीचे गाठोडे दिले सुबारावांच्या खुंटीस अडकवून आणि झाले मोकळे ! दुसरे काय ? ज्ञानप्रकाशकारानी टिळकांच्या भाषणाचा जो उल्लेख केला आहे त्यास आणखी असे उत्तर आहे की हे भाषण कलकत्त्यास वंगभगाची चळवळ जारीने चालू असता विलायती मालाचा बहिष्कार व स्वदेशी हे निःशस्त्र- प्रतिकाराचे उपाय लोक अमलात आणीत असता केलेले आहे आणि टिळक या वेळी जे काही बोलले ते निःशस्त्रप्रतिकारास उद्देशून असून या निःशस्त्रप्रति- कारात मालाच्या बहिष्कारापासून कर न देण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो