पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ त्याला छपवून आश्रय देणारे, त्याला पळून जाण्याला मदत करणारे, आणि कोर्टात त्याचा खटला भांडून त्याला सोडवू पाहणारे अनेक लोक असणारच. अशा रीतीने दोन ठिकाणी पार्लमेंटात व बाहेर एकच प्रयत्न एकाच हेतूने दोन प्रकारानी एकाच वेळी चालू होता. सरकारचा दोघानाहि सारखाच विरोध, पण सरकारच्या मनावर या प्रयत्नाचे परिणाम मात्र निरनिराळ्या प्रमाणाने होत होते. ते असे की पार्नेलने पार्लमेंटात शेतकऱ्यांच्या दुस्थितीचे कितीहि हृदयद्रावक वर्णन केले तरी प्रधान मंडळ ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देई. पण एखाद्या जुलुमी जमीनदाराचा खून एखाद्या गांजलेल्या शेतकऱ्याने केला किंवा त्याचा वाडा जाळला किंवा त्याच्या गुराढोराना जखमी करून निकामी केले अशी बातमी प्रधानमंडळाने ऐकली तर त्याला खरा क्रोध येई. आय- लेडच्या कारभारात कोठे काही बिघडले आहे खास इतके ज्ञान त्याच्या मनाला होई! अशा रीतीने देशात चालू असलेल्या एकाच चळवळीच्या दोन प्रकारांचे व परिणामांचे ज्ञान त्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही प्रकारच्या पुढान्याना व अनु- यायाना परस्पर असणारच. आणि नुसते ज्ञानच काय म्हणून ? एक प्रकारची सहानुभूतीहि वाटणार. आणि लॅन्डलीग सारखी संस्था काढली म्हणजे या दोन्ही परंपरेचे लोक तीत येऊन सहजच मिसळणार, व ते असे मिसळले असता त्यानी परस्पर संबंधाची मर्यादा किती ठेवावी व किती ठेवू नये हे कोण ठरव णार ? गंगा आणि यमुना यांचा संबंध होतो त्या ठिकाणी काळसर पाणी ते काळसरच व पांडुरके ते पांडुरकेच दिसते. पाणी आपला रंग काही बदलीत नाही. पण कोणत्या ठिकाणी यमुनेच्या पाण्याने गंगेच्या पाण्याला आत घेऊ नये, उलट कोणत्या ठिकाणी गंगेच्या पाण्याने यमुनेच्या पाण्याला आत घेऊ नये, अशी मर्यादा कोणी घालून देऊ शकेल काय ? त्याच रीतीने पार्नेलने अत्याचारी शेतकन्यांशी किंवा अत्याचारी शेतकऱ्यानी पार्नेलशी कोणत्या मर्यादेपर्यंत संबंध ठेवावा याचा लेखी नियम करणे किंवा मर्यादा घालणे शक्य नव्हते. शेतकन्यांची अशी खात्री की पार्लमेंटातील पार्नेलची सनदशीर चळवळ फुकट आहे. व पार्नेलची अशी खात्री की जुलूमी जमीनदारांचे कितीहि खून पडले तरी त्या दोन्ही वर्गांचे संबंध जुने जाऊन नवे काही व्हावयाचे तर पार्ल- मेंटात बिल येऊन त्याचा प्रत्यक्ष कायदा बनल्याशिवाय होणे नाही. तथापि कोणताही एक प्रयत्न स्वतंत्रपणे यशस्वी म्हणजे पूर्णफलदायी होऊ शकत नाही हे दोघानाहि दिसून येत होते. आणि केवळ स्वभावाप्रमाणे किंवा परिस्थितीप्रमाणे कोणी पार्नेलसारखा इकडे लँग लीगचा सभासद होऊन पार्लमेंटात जाऊन अडवणूक करी, कोणी मायकेलसारखा मनुष्य पार्लमेंटच्या निवडणुकीच्या भान- गडीत न पडता स्वत: शेतकरी नसतादि शेतकऱ्यांचा जमीनदाराविरुद्ध पाठपुरावा करी आणि अमेरिकेहून पैसा व हत्यारे आणून त्याना पुरवी, तर कोणी स्वतः शेतकरी म्हणून जमीनदारांच्या जुलूमाला हातात दंडा किंवा इत्यार घेऊन प्रति-