पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ आयर्लंडचा दाखला २३ वेटिव्ह पक्षाला देता येई. आणि स्वतःचे काम न साधले तरी एका पक्षाला ती मते देऊन दुसऱ्याचा पाडाव करण्याची दहशत घातल्याने एखादे वेळी आयरिश पुढा- -यांची भेदनीति सिद्धीस जाऊ शके. पण साम दाम व भेद उपयोगी पडतना म्हणून दण्डनीति अनुसरावी म्हटले तर आवरिश पुढाऱ्याना इतकेच करता येत असे की अनेक प्रकारे अडथळा करून वादविवाद लांबवून पार्लमेंटाचे इंग्लंड संबंधाचे काही काम सरळ होऊ द्यावयाचे नाही किंवा तडीस जाऊ द्यावयाचे नाही. आमचे काम नीट होत नाही तर तुमचेहि नीट होऊ देत नाही असे म्हणणे, किंवा प्रतिपक्षाला टाकून बोलणे, अध्यक्षाची अवज्ञा करणे, बाहेर जा म्हटले तरी हाताने धरून घालवून दिल्याशिवाय न जाणे हेच येऊन जाऊन पार्लमेंटमधील दण्डनीतीचे अधिकांत अधिक स्वरूप होते. पार्नेल बिगर होली ओब्रायन डिलन वगैरे लोक या अडवणुकीच्या धोरणामुळे प्रबल ठरले व प्रसिद्धीला आले. पार्लमेंटातील बंडखोरी म्हणजे फक्त असभ्य वर्तन. त्यांत शिवी देण्यापेक्षा मोठा घातपात नाही व सभेतून बाहेर घालवून देण्यापेक्षा अधिक शिक्षा किंवा स्वार्थ- त्याग नाही. पण पार्लमेंटबाहेरील चळवळीत दण्डनीतीची मर्यादा फार पुढे जाऊ शकते. जुलुमाने गांजलेले शेतकरी किंवा माथेफिरू देशभक्त याना पार्लमेंटमधील ही लढाई लटुपुटीची वाटल्यास आश्चर्य नाही. गुलाल गोठ्यांचे युद्ध खेळल्याने कपडे व अंग लाल होतात पण ते रंगाने रक्ताने नव्हे. गुलाल गोट्याच्या खेळा- प्रमाणे बाम्बगोळे पिस्तुले तोफा बंदुका घातक शस्त्रे यांच्या खेळाला युद्ध हेच नाव- पण तेथे अंग रंगते ते रंगाने नव्हे तर रक्ताने रंगते हाच खरा भेद आहे. पार्लमेंटात बसणारा आयरिश पुढारी कायद्याचे बिल पुढे आणील पण विचाऱ्या शेतकन्याजवळ हाताशिवाय आणि प्रसंगविशेषी हातातील हत्याराशिवाय पुढे आणण्याला काय मिळणार ? पार्लमेंटातील शिव्या देण्याची भाषा झाली तरी तिला मर्यादा आहे. पण शेतकरी रागावून शिव्या देऊ लागला म्हणजे त्याला छापील शब्दकोशाचीहि मर्यादा नाही. पूर्वी कधी कोणी न ऐकल्या अशा नव्या शिव्या बनवून तो देणार आणि ऐकणारालाहि त्याप्रमाणानेच राग येणार. पार्लमेंटातील पुढारी पट्टेवाल्याने अंगाला हात लावल्यावर आपल्या पायाने बाहेर जाणार, पण शेतकरी जमीनदाराला म्हणणार माझ्या अंगाला हात लावण्याची कोणाची माय व्यायली आहे ? मी जिता शेतांतून बाहेर निघणार नाही माझे प्रेत बाहेर न्याल तर कोणास ठाऊक ! पण जीवच द्यावयाचा तर तो सुखासुखी का देईन ? येऊन जाऊन गेला तर माझा एक जीव जाणार पण माझ्यासारख्या इतर अनेकाना छळणारे जितके अधिक जीव मला घेता येतील तितके जीव मी आपला जीव देण्यापूर्वी का घेऊ नयेत? पार्लमेंटातील सभासदांची व बाहेरच्या शेतकऱ्यांची ही तुलना झाली. पण त्या सभासदाला सहानुभूति दाखवून त्याला निवडून देऊन त्याच्या दंडनीतिला उत्तेजन किंवा चिथावणी देणारे जसे मतदार तसेच, या आडदांड शेतकन्याला सहानुभूति दाखवून उत्तेजन देणारे, पैसा पुरविणारे, हत्यारे पुरविणारे,