पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ लो० टिळकांचे चरित्र भाग ८. दाखला द्यावयाचा तर तो आयर्लंडच्या इतिहासातील पार्नेल प्रभृति पुढाऱ्यांचा. म्हणजे पार्लमेंटातील लँड लीगच्या पुढारी सभासदांचा. आयर्लंडमध्ये राष्ट्राकरिता म्हणून काम करणान्या लोकांची उतरत्या चढत्या भांजणीने बिनशर्त राजनिष्ठापासून बंडखोरापर्यंत एक अखंड माळ लागलेली होती व या माळेतील मध्यमेरूचे स्थान लैंड लीगची चळवळ करणाराकडे होते. लँड लीगचा उद्देश आयरिश शेतकऱ्याना स्वतंत्र करणे हा होता. सर्व शेतजमिनीचे मालक इंग्रज जमीनदार हेच जवळजवळ होऊन बसले होते. आयरिश लोक ही उपरी कुळे बनली होती. शेतीची सुधारणा नाही, उत्पन्न कमी, खंड फार व जमीनदार केव्हा घालवून देईल आणि बेकारी केव्हा पदरी येईल याचा नेम नाही. अशा स्थितीमुळे आयरिश शेतकरी वर्ग अगदी गांजून गेला होता. त्याच्या दारि- याची व दुस्थितीची वर्णने वाचली असता कोणाच्याहि अंगावर शहारेच उभे राहतील. आयरिश जनतेतील फार मोठी संख्या शेतकरी वर्गाची. आणि आधी खाण्याला पोटभर घास मिळवून दिल्यावर मग आयर्लंडला स्वातंत्र्य कसे मिळ- विता येईल याचा विचार म्हणून आयर्लंडला पूर्ण स्वतंत्र किंवा निदान अर्ध स्वतंत्र अशी पार्लमेंट मिळण्याची सर्व साधारण चळवळ सुरू असताच शेतकऱ्यांची स्थिति सुधारण्याची ही एक वेगळीच स्वतंत्र चळवळ त्याबरोबर चालू होती. नुसती ही स्थिति सुधारावयाची म्हटली तरी त्याला कायदा करावा लागणार आणि तो कायदा होणे हे कर्म महाकठीण. कारण सगळ्या पार्लमेंटात आयरिश सभासद असे साठ सत्तर आणि बहुमतवाल्या मोठ्या म्हणजे लिबरल किंवा कान्झव्हेंटिव्ह पक्षातून असा कायदा करण्याचे काम स्वतः उचलण्याला कोणी तयार नाही. यामुळे स्वराज्य नाही म्हणून सुराज्य नाही व सुराज्य नाही म्हणून स्वराज्यहि नाही अशी म्हणजे ज्याचे पाय त्याच्याच पायात घालून कोलदांडा बसवावा अशी- हिंदुस्थानाप्रमाणे आयर्लंडचीहि स्थिति झाली होती. ही स्थिति सुधारण्याचे निर्णा- यक साधन कोणाचेच हाती नव्हते. पण ज्याचा पाय जेथे रोवला जाई तेथे तो आपल्याकडून होईल ती खटपट करीत होता. या खटपटीचे प्रकार अर्थात् वेगवेगळेच असावयाचे. जे आयरिश सभासद ब्रिटिश पार्लमेंटात निवडून जात ते तिथल्या रीतिप्रमाणे साम दाम दण्ड भेद योजीत. बाहेर देशात जुलमी जमीनदार व गांजलेला शेतकरी यांची गाठ पडली असता तेथेद्दि साम दाम दण्ड भेद या नीती- चाच अवलंब होत असे, पण नीति तीच असली तरी तिची कृत्ये वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची होतात. पार्लमेंटातील साम म्हणजे आयझॅक बटसारखा संभा- वित दाक्षिण्यपूर्ण उदार स्वभावाचा देशभक्त गोड बोलून युक्तिवाद चालवून आणि इंग्रजांच्या औदार्यबुद्धीला आळवून करीत असे तो दामनीति अनुसर- प्याला व भेदनीति अनुसरण्याला आयरिश सभासदाजवळ त्यांच्या पाच पन्नास मतांच्या गटाशिवाय दुसरे काहीच साधन नव्हते. आपले काम साधण्याची किंमत किंवा मोबदला म्हणून या पाच पन्नास मतांचा लाच त्याना लिबरल किंवा कान्झर-