पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ आयर्लंडचा दाखला २१ is known by the company he koops feat Things which are equal to a third thing ars equal to one another या तत्त्वाप्रमाणे टिळक हे अत्याचारीच होत. पण चिरोलसाहेब किंवा लंडनची ज्यूरी यांचा हा निकाल हिंदुस्थानच्या लोकाना कितपत मान्य होण्यासारखा आहे इतकाच विचार प्रस्तुत चर्चेत आम्हाला कर्तव्य आहे. स्वतः टिळकाना हा निकाल मान्य नव्हता ही गोष्ट त्यानी इतका खर्च सोसून व उलट तपासणीचे जोखीम पत्करून चिरोल साहेबावर फिर्याद लावली यावरूनच उघड होत आहे आणि त्यांच्या मित्रमंडळीनी त्यांच्या खर्चाकरिता तीन लक्ष रुपये जमविले व लोकानी ते दिले यावरून त्यानाहि हा निकाल मान्य नव्हता हे दिसून येते. पण आपल्या समाजात असे पुष्कळ लोक आहेत की त्याना या गोष्टीचा निर्णय आपल्या मनाशी बरोबर करता येत नाही. अशा लोकाना परराष्ट्राच्या इतिहासातील एखादा दाखला घेऊन सांगितले असता कदाचित विचाराला मदत होईल म्हणून तो दाखला खाली वाचकापुढे मांडित आहो. टिळक स्वतःला राजद्रोही म्हणवून घेण्याला तयार किंवा त्यात कमीपणा न मानणारे होते. पण अत्याचारी म्हणणे ही त्याना आपली बेअब्रू वाटत होती. व. अत्याचारी याचा अर्थ स्वतः अत्याचार करणारे नव्हेच पण अत्याचाराना प्रवृत्त करणारे असे अप्रत्यक्ष वर्णनहि त्याना बेअब्रूकारक वाटत होते. हा प्रश्न कायदे- शीर जबाबदारीचा नव्हता तर नैतिक जबाबदारीचा होता. टिळक हे कोणत्याहि अत्याचाराला कायदेशीर रीतीने जबाबदार नव्हते याचे प्रमाण हेच की तो गुन्हा सरकाराला त्यांचे अंगी केव्हाहि भिडविता आला नाही. गुप्तपणाने समाजात हजारो ठिकाणी वावरणारे व हजारो डोळ्यानी पाहणारे सरकार तसा काही पुरावा मिळता तर तो पुढे आणल्याशिवाय राहते ना. आणि टिळक वर्तमानपत्रकर्ते नसते तर व्यक्तिशः त्यानी केलेल्या सर्व खटपटी व चळवळी करूनहि त्यांच्यावर कधी खटला झाला नसता व त्यानी तुरुंगात जावे लागले नसते, पण एखादी जबाबदारी कायदेशीर नसली तरी नैतिक असू शकते. तीच टिळकांच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न चिरोल साहेबानी पुढे केला व ती झिडकारून टाकण्याचा प्रयत्न टिळकानी केला. याचे कारण टिळकांचे मन त्याना असे सांगत असावे की, अत्याचारांची नैतिक जबाबदारी अंगावर येत असेल तर मनुष्याने ती स्वीकारली पाहिजे, पण ती गोष्ट अंगावर येण्याला अत्याचारी लोकाशी, अत्याचारी कृत्यांच्या पूर्वी किंवा नंतर, अमुक एक प्रकारचा व अमुक एका मर्यादेपलीकडे संबंध मनुष्याने ठेवलेला असला पाहिजे तसा माझा नाही. म्हणून ती नैतिक जबाब- दारी मजवर नाही व ती आहे असे जो म्हणतो तो माझी बेअब्रू करतो. चिथावणी करणे उत्तेजन देणे हे शब्द फार व्यापक व भ्रामक होत. व कोणी कोणाशी किती संबंध ठेवल्याने चिथावणी दिली असे होते किंवा देऊ नये तितके उत्तेजन दिले असे ठरते हाच काय तो वादग्रस्त प्रश्न असतो. व या नाजूक सरहद्दीवरच सर्व ओढाताण व खेचाखेच चालू असते. टिळकांच्या या नाजूक स्थितीला