पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० 0 लो. टिळकांचे चरित्र भाग ८ बुद्धि न चालविणारी तिरकस आडव्या तिडव्या चालीची म्हणजे केवळ कुत्सित मनाची अल्प मर्यादित शक्तीची पण इतर कोणालाहि न करता येण्यासारखे काम एखादे वेळी साधणारी माणसे उपयोगी पडतात. अशा रीतीने स्वभाव गुण बुद्धि कर्तृत्व कल्पना योजना पराक्रम स्वार्थत्याग वगैरे विविधगुणांच्या माणसांचा उपयोग सार्वजनिक कार्यात होत असतो. म्हणून तू अमुक मनुष्याशी संबंध ठेव अमक्याशी ठेवू नको अमुक मनुष्याचा उपयोग कर अमुकाचा करू नको असा निर्बंध कोणी घालू लागल्यास कार्यासक्त म्हणून लोकसंग्रहेच्छू असणाऱ्या पुढाऱ्याना त्याचा जाच दुःसह होतो. हा निर्बंध तो पाळीत नाही व त्याकरिता दुसन्याचा गैरसमज झाला तरी सोसण्यास तयार होतो. हिंदुस्थानातील परिस्थिति वाचकांच्या डोळ्यापुढे सर्व बाजूंनी आहेच. यामुळे इकडील उदाहरणे घेऊन वरील सिद्धांत स्पष्ट करण्याचे कारण नाही. किंबहुना अशी उदाहरणे आम्ही देऊ लागलो असता त्यात अनेक अप्रिय अशा गोष्टी बोलाव्या लागतील. म्हणून वरील भानगडीच्या तत्त्वावर किंवा गुंतागुंतीच्या प्रभावर सर्व बाजूनी प्रकाश पाडणान्या अशा एका परराष्ट्राच्या इतिहासांतलेच एक ठळक उदाहरण घेऊ. आरशात प्रति- बिंब पाहिल्याने मनुष्याच्या प्रत्यक्ष तोंडाकडे न पाहता कार्यभाग होतो. त्याप्रमाणे इकडील उदाहरणे न देता परस्पर दुसऱ्या एका राष्ट्राच्या पुढाऱ्याची हकीगत वाचली असता वरील प्रश्नाचे स्पष्टीकरण सहज होऊन त्या प्रश्नाचे उत्तरहि 'समर्पक मिळेल. हिंदी राजकारणाला आयरिश इतिहासाचे दाखले जितके तंतोतंत लागू पडतात तितके दुसऱ्या कोणत्याहि राष्ट्राच्या इतिहासातील लागू पडत नाहीत ही गोष्ट आता पुष्कळाना माहीतच आहे. आम्ही पूर्वी आयर्लंडच्या इतिहासावर जे एक पुस्तक १९१० साली प्रसिद्ध केले ते ज्यानी वाचले असेल त्याना चालू प्रश्नाची चर्चा त्यात थोडी बहुत केलेली आढळलीच असेल. तथापि कार्यानुरोधाने या पुस्तकातहि तोच विषय मांडणे पुनः प्राप्त म्हणून तो पुनः थोडासा मांडीत आहो. त्यावेळी टिळकांवर राजद्रोहाचा दुसरा खटला होऊन त्याना शिक्षा झाली होती तरी तिला आधार फक्त केसरीतील काही लेखांचाच होता. स्फोटक द्रव्यासंबंधाने दोन पुस्तकांची नावे लिहिलेले एक कार्ड खटल्यात पुढे आले होते पण त्यावर मुख्य भर कोणी दिला नाही. पण त्या खटल्यात जो एक मुद्दा टिळकांचे विरुद्ध आणण्यात आला नाही तो चिरोल खटल्यात आणला गेला हे त्या खटल्याची दुसऱ्या एका प्रकरणात दिलेली हकीगत वाचणारांच्या लक्षात आले असेल. हा मुद्दा म्हटला म्हणजे असा की 'टिळक हे अत्याचारी लोकांशी संगत व संबंध ठेवतात अर्थात् ते स्वतः एकप्रकारे अत्याचारी असे समजण्याला इरकत नाही. आणि त्यांचे कोणी तसे वर्णनहि केले तरी ती काही बेकायदेशीर अब्रू होत नाही.' हाच निकाल लंडनच्या ज्यूरीने या खटल्यात टिळकाविरुद्ध दिला. चिरोल काय किंवा ज्यूरीतील लोक काय यांचा बाणा असा की A man