पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ आयर्लंडचा दाखला १९ तुम्हीहि त्याच मताचे किंवा तीच कृत्ये करणारे असे आम्ही समजू, मग प्रश्न असा येतो की, हा आक्षेप दूर करण्याकरिता अशा लोकांचा संबंध व्यवहारात टाकून द्यावयाचा की काय ? व टाकून द्यावयाचा म्हटले तरी तो टाकून कसा देता येणार ! अगदी मूलग्राही उदाहरण घ्यावयाचे तर असे की एक भाऊ तीव्र राजकीय चळवळीत पडून सरकाराला अप्रिय झालेला आहे व दुसरा भाऊ सर- कारी नोकरीत प्रथमपासून गेला असल्याने तो रीतीप्रमाणे आपले काम करीत आहे व बढती मिळवीत आहे. यावर प्रश्न हा की एका बाजूने सरकाराला एक आवडत नाही म्हणून व दुसऱ्या बाजूने लोकाना एक आवडत नाही म्हणून या भावानी आपला संबंध तोडून टाकावयाचा की काय ? व तो तोडणे शक्य आहे काय ? ही अडचण गेल्या वीस वर्षांत आपल्या देशामध्ये पुष्कळ भावाभावाना अनुभवावी लागलेली आहे. आणि जी गोष्ट भावाभावांची तीच स्नेह्या स्नेह्यांची आणि जी खासगी स्नेह्यांची तीच सार्वजनिक कार्यात पडलेल्या सहचर व सहकारी लोकांची. नुसते बोलणाराला तुम्ही अमक्याशी संबंध ठेऊ नका म्हणणे सोपे असते. तसेच ज्याला कार्य असे काहीच करावयाचे नाही त्यालाहि मनाने एखादा मनुष्य अयोग्य ठरविला तर त्याच्याशी संबंध न ठेवणे किंवा तोडून टाकणे ही गोष्ट सोपी असते. पण ज्याला काही तरी कार्य म्हणून करावयाचे असेल त्याला स्वतःशी मते न जुळणान्या किंवा अयोग्य व अपात्र अशा लोकाशीहि संबंध ठेवावा लागतो कारण तो न ठेवला तर कार्यच होत नाही. ही अडचण एखाद्या स्वासगी कामातहि येते मग ती सार्वजनिक कार्यात आल्यास काय नवल ? बुद्धि- बळाच्या पटात निरनिराळ्या शक्तींची व चालींची मोहरी असतात आणि आपला डाव साधावयाचा तर तत्क्षणी उपयोगी पडेल त्या मोहन्याचाच खेळणाराला उप- योग करावा लागतो. मग तेथे उच्चनीच भाव किंवा आवडनिवड ही ठेऊन चालत नाही. वेळी नाकासमोर आणि एकच घर चालणारे प्यादे राजा वजीराचे घर रोखू शकते व त्यावर हल्ला करून मारून काढू शकते किंवा शह देऊ शकते. अर्थात् प्यादे क्षुद्र म्हणून ते वर्ज्य करून चालत नाही. उंट पल्लेदार पण सरळ मार्गी. त्याला मागेपुढे जाता येते पण आजूबाजूला जाता येत नाही. हत्ती असाच पल्लेदार पण तोहि सरळमार्गी; मात्र तो उंटापेक्षा अधिक कार्यक्षम कारण त्याला नुसता पुढे मागेच नव्हे तर चौफेर मारा करता येतो. आणि त्याने एकदा मोहरे विरेला धरले म्हणजे खुद्द राजाने स्थलांतर केल्याशिवाय त्याची सुटका होत नाही. याच्या पुढची पायरी वजीराची. कारण त्याच्यामध्ये प्यादे उंट हत्ती या सर्वांचे गुण सांठविलेले असतात. पण मूळ खेळाची योजना करणाराने अशी करामत करून ठेवली आहे की घोड्याला जी एक विलक्षण शक्ति आहे ती खुद्द वजी - रालाहि नाही. त्याचा मारा फक्त अडचाव्या घरांतच होतो. प्याद्यासारखीहि दोन घरांत हल्ला करण्याची शक्ती त्याला नाही. पण या तिरकसपणाच्या शक्तिमुळेच घोड्याचा पराक्रम काही विशेष प्रकारचा घडतो. सार्वजनिक कार्यात कधीहि सरळ-