पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ लो. टिळकांचे चरित्र भार्ग ८ चित्ताची अखंड व्यग्रता व दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे त्यांच्या हेतूविषयी सर्व लोकांचा नेहमी होणारा गैरसमज आणि त्यामुळे इतर सर्व पक्षांच्या मिळणाऱ्या शिव्या ! लँडलीगच्या एकंदर चळवळीतील कायदेशीरपणाचा भाग किती व बेकायदेशीरपणाचा किंबहुना अत्याचारीपणाचा भाग किती हे उक- लून काढणे ही गोष्ट कोणालाहि अशक्यप्रायच होती. पार्नेल प्रभृति अनेक आयरिश राष्ट्रीय पुढाऱ्यांचा काही वेळ व काही श्रम हे ही गुंतागुंत सोड- वून दाखविण्याच्या प्रयत्नात सतत खर्च होत असे. आणि सुप्रसिद्ध पार्नेल कमि- शनचा रिपोर्ट जो कोणी वाचून पाहील त्याला या पुढाऱ्यांची स्थिति किती बिकट होती हैं बरोबर कळून येईल. कोणत्याहि समाजात असा कोणीहि मनुष्य नसतो की जो वरखाली निर- निराळ्या मताच्या लोकांच्या कात्रीत सांपडलेला नसतो. नेमस्ताना सरकार मना - तून म्हणत असते की, 'हे लोक झाले तरी काय तोंडाने स्पष्ट बोलत नाहीत इतकेच काय ते ! पण अंतरंगात ते व जहाल एकच आहेत. आणि सरकार नेमस्ताना उघड असे म्हणत असते की, तुम्ही नेमस्त म्हणविता, राजनिष्ठ म्हणविता, पण टिळकासारखे राजद्रोही किंवा सर्वसामान्यपणे राष्ट्रीय पक्षाचे लोक यांच्याशी संबंध का ठेवता ?' पण स्वतः जहाल लोक झाले तरी या कालीतून सुटले आहेत असे नाही, त्याना एकीकडून मवाळ लोक म्हणत असतात की हे अत्याचारी लोकाशी संबंध ठेवतात म्हणून ते अत्याचारप्रवर्तकच होत. आणि दुसऱ्या बाजूने अत्याचारी लोक त्याना म्हणत असतात की 'टिळकासारखे लोक झाले तरी ते एकप्रकारचे मवाळच. कारण यांचा कायद्यावर व कायदेशीर मार्गावर विश्वास निदान भिस्त खरी. मवाळ लोकाप्रमाणे आम्हाशी ते फटकून वागत नाहीत. प्रसंगविशेषी आम्हाशी सहानुभूतिहि दाखवितात हे खरे. पण हा प्रश्न व्यक्तिमात्राशी भलेपणा ठेवण्याचा नाही. तर राष्ट्राला स्वराज्य किंवा स्वातंत्र्य खरे कोणत्या मार्गाने मिळेल याच्या निर्णयाचा आहे. टिळकासारखे लोक तेजस्वी बाणेदार किंवा स्वार्थत्यागी असले तरी त्यानाहि राष्ट्रीय चळवळीचे खरे मर्म समजलेले नाही व समजले असले तरी उमजले नाही. कार्यसिद्धीला जी उडी घालावी लागते ती यांच्या हातून घातली जात नाही. नेमस्ताहून अधिक स्वार्थत्यागी व वीट एवढ्याकरिता त्याना आदराने वागविणे प्राप्त नाहीतर निवळ साधन, मार्गांच्या दृष्टीनेच पाहिले तर त्यानाहि मूर्खाच्या मालिकेतच बसविणे योग्य होईल. अशाच रीतीने एकीकडे सरकार व दुसरीकडे स्वतःला एकांतिक म्हणविणारे अत्याचारी लोक देहि मतविरोधाच्या कात्रीत कसे सांपडलेले असतात याची वाचकाना मनाने कल्पना करता येते. आता या कात्रीचा अर्थ केवळ त्यांच्याबद्दल काही लोकांचे मत वाईट होणे इतकाच असल्यास तो फारसा जाचक होत नाही; पण त्याचा अर्थ असाहि असतो की, अमुक एका प्रकारच्या लोकाशी तुम्ही संबंध ठेवू नये व तो तुम्ही ठेवला तर