पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भोग ८ आयर्लंडचा दाखला १७ लेडचे हित साधेल ते साधावे. यापुढची चळवळीची कोणतीहि पायरी त्याला मान्य नव्हती. आणि बाहेर कितीहि लोकमताची खेती केली तरी प्रत्यक्ष पीक पदरात पडावयाचे ते कोणत्या तरी प्रधान मंडळाच्या हातून ही गोष्ट लक्षात घेतली असता आयझॅक बट याची उपपत्ति तितक्या पुरती बरोबर आहे. पण दुसऱ्या बाजूला पाहिले असता वुल्फ दोन याचीहि उपपत्ति तितक्या पुरती बरोबर असल्याने त्यालाहि चूक म्हणता येत नाही. आणि आयझॅक बट याने प्रधानमंडळाला खुष करणे हा जसा एकेरी मार्ग पतकरला तसाच वुल्फटोन यानेहि बंडाच्या खटपटीचा एकेरी मार्ग पतकरला व त्या दोघानाहि अपयश आले तरी मनाचे सुख लाभले. आयर्लंडच्या राष्ट्रीय पक्षात शुद्ध अत्याचारी म्हणून जे वर्ग होऊन गेले त्या सर्वांना आम्ही वुल्फटोन याच्याच वर्गात ढकलतो. त्यांचा वेगळा विचार करण्याचे कारण नाही. कारण वुल्फटोन प्रमाणे तेहि एकेरीच विचाराचे होते. फरक इतकाच की बुल्फटोन याची चळवळ सामुदायिक स्वरूपाची व या अत्याचारी लोकांची चळवळ व्यक्तिमर्यादित. पण दोघेहि शुद्ध दंडनीतीचेच भोक्ते. वुल्फटोन याचा विचार असा की डब्लिन कॅसलमधील अधिकारी मंडळच्या मंडळ सगळे कैद करून विलायतेला पाठवावे आणि या प्रयत्नात जे आड येतील त्याना कैद करून किंवा मारून टाकून वाट मोकळी करावी. व्यक्तिशः अत्या- चार करणारांची येवढी व्यापकदृष्टि नव्हती. तर पायाला काटा लागला म्हणजे तेवढाच जसा काढून टाकावयाचा तसे जो कोणी आयर्लंडातील इंग्रज अधिकारी किंवा जमीनदार दु:सह होईल तेवढा काढून किंवा कापून टाकावयाचा इतकेंच ते जाणत. तात्पर्य वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या लोकाना डोळ्यापुढे एकच मार्ग दिसत असल्याने त्यांच्या मनाला व्यग्रता आली नाही. पण 'युनायटेड आयर्लंड' पत्राचा संपादक वर्ग किंवा लँडलीगचा पुरस्कर्ता पार्नेल अशा लोकांची स्थिति मात्र अनुकंपनीय होती. कारण त्यांचे मन पूर्णपणे एकेरी नव्हते. निखालस एकेरी धोरणाने त्यांचे कार्य साध्य होण्यासारखे नव्हते पण उलट याच कारणामुळे त्यांच्या मनाला व्यग्रताहि अधिक जाचीत असे. आयझॅकलट प्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये राहून तेथील कार्यपद्धतीच्या द्वारे आयर्लंडचा जो फायदा होईल तो करून घेणे हे त्याना हवे होते, पण त्यांजबरोवर अपरिहार्य अशा कारणानी आणि स्वतंत्र स्फूर्तीने जे काही अत्याचार घडतील त्यांच्या धाकदहशती- मुळे प्रधान मंडळाच्या किंवा इंग्रज जनतेच्या मनावर जो वचक बसेल त्याचाहि फायदा घ्यावा अशा मताचे ते होते. एका बाजूला आयझॅकबटप्रमाणे ते अत्याचारांचा किंवा दंडनीतीचा एकांतिक निषेध करणारे नसत, व दुसऱ्या बाजूला क्रांतिकारक फेनिय निस्ट मूनलाइटर्स वगैरे अत्याचारी सांप्रदायाप्रमाणे पार्लमेंटरी चळवळीचा एकां- तिक निषेध करणारेहि ते नव्हते. पण या दुहेरी चळवळीचा फायदा विकत घेण्या- करिता त्याना अनेक प्रकारची किंमत द्यावी लागत असे. पहिली गोष्ट स्वतः त्यांच्या टि० पू... ३५