पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ करतो तिची तात्त्विक जबाबदारी सरकारावर असते तितकीच अनुयायांच्या कृत्या- बद्दलची जबाबदारी पुढाऱ्यावर आहे अगर नाही असे समजले पाहिजे. म्हणजे तात्त्विक दृष्ट्या ती आहे खरी पण प्रत्यक्ष व्यवहारदृष्ट्या ती नाही. एखाद्या सैनि- काच्या अत्याचाराबद्दल जर सेनापतीला फाशी देत नाहीत तर अनुयायांच्या अत्या- चाराबद्दल पुढाऱ्याला फाशी देण्याला का काढावे ! काही एका मर्यादेपलीकडे जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीच्या कृत्यावरूनच ठरवावी लागते. एरवी समाजात देखील लोक एकत्र राहतात त्याप्रमाणे राहता येणे शक्य नाही. राजकीय पक्ष घेतले असता त्यांच्या घटनेत व कार्यात फरक काय असतो हे वर दर्शविलेच आहे. अर्थात् अशा पक्षातील एखाद्याने स्वतंत्र रीतीने व आपल्या जबाबदारविर जर एखादी गोष्ट केली आणि ती सामुदायिक उद्देशात पडत नसली तर तिजकरता पुढायला जबाबदार धरणे किंवा दोष देणे हा अन्याय होय. (४) आयर्लंडचा दाखला हिंदी राष्ट्रीय चळवळीत अत्याचार झाले हे वाक्य शब्दशः घेता येत नाही. व्याकरणदृष्ट्या या वाक्याचा जो अर्थ तो कायदेशीर किंवा नैतिकदृष्ट्या योग्य ठरत नाही. हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळीत काही अत्याचार घडले याचा अर्थ ते अत्याचार हा त्या चळवळीचा एक भाग होता असा नाही. तर ज्या काळात ही राष्ट्रीय चळवळ चालू होती त्या काळात ते अत्याचार घडले इतकाच त्या वाक्याचा अर्थ घ्यावयाचा. आणि याला एखादा दाखला घ्यावयाचा तर आयर्लंड मधील राष्ट्रीय चळवळीचा देता येईल. ही चळवळ पांचपन्नास वर्षे चालू असली तरी माळेत ज्याप्रमाणे फुले निरनिराळी पण दोरा एकच त्याप्रमाणे कृत्ये निर- निराळ्या प्रकारची पण राष्ट्रीय भावना एकच प्रकारची होती. केवळ पार्लमेंटमध्ये राहून आयरिश राष्ट्राचे पाऊल पुढे टाकवणे हेच काय ते एकटे खरे राजकारण असे मानणान्या आयझॅक बट्ट पासून प्रत्यक्ष बंडाशिवाय राजकारणाचा दुसरा कोणताही प्रकार संभवतच नाही असे मानणाऱ्या बुल्फटोनपर्यंत एकच माळ किंवा साखळी लागून राहिलेली दिसते. आणि याच्या दरम्यान गरम नरम सरस निरस कायदेशीर बेकायदेशीर सनदशीर बिनसनदशीर वगैरे सर्व प्रकार समाविष्ठ होतात. पैकी दोन टोकांच्या या दोन माणसांची स्थिति एकप्रकारे सुखाची असते. मनुष्याच्या मनाचा एकेरीपणा कार्याच्या दृष्टीने परिणाम कारक नसतो तथापि त्याच्या मनाला तो नेहमी सुख देतो व त्याची अनेक प्रकारची दगदग आणि चिंता वाचवितो. आयझॅकबटला फक्त एकच गोष्ट माहीत असे ती ही की पार्लमेंटमध्ये आयर्लंडतर्फे निवडून यावे आणि तेथे जे कोणचे प्रधान मंडळ ज्या वेळी अधिकारारूढ असेल त्याच्याशी स्नेहभावावे वागून त्याची मर्जी संपादून त्याला थोडीशी भीड मोहबत घालून किंवा एखादे वेळी त्याच्या विरुद्ध मत देण्याचा धाक दाखवून किंवा प्रत्यक्ष विरुद्ध मत देऊन जे काय आय-