पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ८ अत्याचारीलोक व टिळक १५ होईन. व तसा झालो तर त्याचे भूषणच मानीन. तुम्ही देखील अशा उपयोगा- करिता हे तुमचे पिस्तुल जरूर राखून ठेवा. पण तुम्ही बंडखोरीच्या ज्या कल्पना परदेशाहून घेऊन आलेले आहात त्यांचा उपयोग आज या देशात नाही इतके मात्र मी तुम्हाला म्हणेन. न्याय्य मार्गात झालेल्या सशस्त्र प्रतिकाराला अत्याचार कोणीच म्हणत नाही. पण असे सशस्त्र सत्याग्रही यहच्छेने कोठे कोठे निर्माण झाले तरी त्याला मी बंडाची तयारी मात्र म्हणणार नाही. अत्याचारी लोकांशी टिळकांचा संबंध येत असे याविषयी आणखी दोन शब्द सांगतो. कोणतीहि चळवळ करणारा कंपू घेतला असता त्याला एकप्रकारे सैन्याचे स्वरूप असते. म्हणजे सैन्यात जशी निरनिराळी पोटदळे असतात तशीच चळ- वळ करणाऱ्या कंपूमध्येहि असतात. आणि सैन्यातील प्रत्येक पोटदळाच्या वर्त- नाची जबाबदारी सेनापतीवर असते त्याप्रमाणे चळवळी कंपूतील प्रत्येक भागाच्या वर्तनाची जबाबदारी पुढाऱ्यावर असते ही गोष्ट तात्त्विक दृष्ट्या खरी आहे. दोहोंत फरक इतकाच की सैन्यामध्ये शिस्तीचे नियम अधिक कडक असतात, पण खाजगी पक्ष किंवा कंपू यांच्यामध्ये शिस्तीची अवश्यकता असली व ती त्यातील लोकानी सामान्यतः मानली तरी लष्कराइतक्या परिणामकारक रीतीने त्या शिस्तीचा अंमल होऊ शकत नाही. ऑलिव्हर क्रॉमवेल याच्या चळवळीत त्याच्या हाताखालील लोकाना काही लष्कराचे व काही राष्ट्रीय चळवळ करणाऱ्या खाजगी कंपूचे स्वरूप होते. आणि त्याला वरील दोन्ही स्थितीतला अनुभव आला होता. त्या संबंधाने त्याने उद्गार काढले ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तो म्हणतो “हल्लीच्या परिस्थितीत मी जे काही स्वतः करतो त्याची जबाबदारी मी घेतच आहे. पण ज्या गोष्टी मी स्वतः करीत नाही त्यांचीहि जबाबदारी मला घ्यावी लागत आहे. याचे कारण मी पुढारी बनलो आहे म्हणून. एखादे वेळी पहावे तो असे घडते भावना अतिशय तीव्र वाढते, मूर्ख वेडे बन- तात, आणि शहाण्याना देखील असे प्रसंग येतात की हे लोक बोलताना व वाग- ताना शुद्धीवर तरी आहेत की नाही कोण जाणे !" क्रॉमवेल याचा चरित्रकार जॉन- मोर्ले याने या गोष्टीला उद्देशून असे म्हटले आहे की "पुष्कळदा अशा पुढाऱ्याचे काम म्हणजे अनुयायानी उत्पन्न केलेल्या परिस्थितीशी झगडत बसणे हेच होऊन बसते. अनुयायानी काही असे सुचवावे की ते याला प्रत्यक्ष मोडून तर काढता येत नाही. पण फारच झाले तर ते लांबणीवर टाकणे, त्याला थोडी कलाटणी देणे, अंगावर घेतल्यासारखे दाखवून परतवणे, समजूत घालून मोडून काढणे, इतकेच त्याला करता येते. यामुळे तो परिस्थितीचा काहीसा दासच होऊन राहतो. पण ही अडचण खरी म्हणून जर तो पुढारी बनणार नाही, अनुयायांचा कंपू जुळवून तयार करणार नाही, तर त्याच्या हातून कोणचेही कार्य तरी कसे होईल ? अर्थात अशा मनुष्यावर टीका करताना टीकाकारानी थोडी सूक्ष्मदृष्टि चालवावी लागते व त्या दृष्टीत सहानुभूतीहि असावी लागते." कोणताही सरकारी नोकर जी एखादी चूक