पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० लो० टिळकांचे चरित्र भाग १ निर्विवाद आहे. तत्पूर्वी सर्व कांही सुरळीत चालले होते. पण ना. गोखल्यांच्या गुप्त पत्राचा त्यावर विव्या पडल्यावर सर्व काही चिघळले अशी स्थिति आहे. हे गुप्त पत्र साधार का निराधार होते हा स्वतंत्र प्रश्न आहे व ना. गोखले किंवा भूपेंद्रनाथ बस् यापैकी कोणी तरी ते पत्र अस्सलवरहुकूम सर्व प्रसिद्ध करीपर्यंत या प्रश्नाचा समाधानकारक निकाल होणे शक्य नाही. समेटाचे सर्व बोलणे जर उघड उघड मोकळ्या मनाने चाललेले होते तर ना. गोखले याना गुप्तपत्राचा हा घाणेरडा मार्ग स्वीकारण्याचे कारण काय ? ते आम्हास समजत नाही. आणि यासाठीच अमृतबझार पत्रिकेने त्याला गुप्तघात हे नाव दिले आहे. ना. गोखले यांच्या हातून घाईने ही गुप्तपणाची चूक झाली असेल नाही कोणी म्हणावे ? पण चूक झाली असल्यास किंवा गुप्तात एखादी गुप्ति नसल्यास, गोखल्याच्या बच्चयानी किंवा त्यानी नाही तर खुद्द ना. गोखल्यानी ते पत्र प्रांजळपणे अस्सलवरहुकूम प्रसिद्ध करून हा घाणेरडा तंटा मिटवावा हेच आमच्या मते सभ्यपणाचे लक्षण होय. गुप्त पत्र गुप्त पेटीत ठेवून कुत्री लोकांच्या अंगावर सोडणे किंवा सुटलेली संथपणाने पाहणे योग्य नाही. " Boycott of Governmwoat " हे शब्द आपल्या पत्रात नाहीत असे ना. गोखले म्हणतात. ठीक आहे. पण दुसरे याच आशयाचे शब्द त्यात नाहीत ना ? असे जेव्हा गोखल्यास विचारण्यात आले तेव्हा तुम्हीच उलट ' सरकारचा बहिष्कार' याचा अर्थ काय करिता ते सांगा म्हणजे मी उत्तर देतो असे गोखले म्हणतात. पण ही कारकुनी न समजण्याइतके इतर लोक मूर्ख नाहीत. पत्र लिहिले गोखल्यानी आणि त्यामुळे केवळ त्याचमुळे-सब्जेक्ट कमि- टीतील लोकांची किंबहुना विझांटवाईची व भूपेंद्रनाथांचीहि टिळक “सरकारला बहिष्कार " टाकणारे आहेत अशी समजूत झाली. ही समजूत खोटी आहे असे कळल्याबरोबर भूपेंद्रनाथ बाबूनी आपले शब्द सभ्यपणाने परत घेऊन माफी मागि- तली. पण ना. गोखले हे शब्द किंवा यासदृश शब्द पत्रात होते की नाहीत सांगत नाहीत व पत्र प्रसिद्ध करीत नाहीत. इतकेच नव्हे तर आपल्या बगलबच्चघाकडून रा. टिळकावर शिव्यांचा भडिमार करवीत आहेत ! याला सभ्यपणा म्हणावयाचा गरीवपणा म्हणावयाचा की दुसरे काही नाव द्यावयाचे याचा वाचकानीच विचार करावा. आमचे तर असे मत आहे की हे पत्र अधिकाधिक दाबून ठेवून त्यातील शब्दाचे किंवा विचाराचे मनसोक्त समर्थन करण्याचा जितका जितका अधिक प्रयत्न होईल तितके तितके लोकांचे मन त्याबद्दल अधिकच साशंक होत जाईल. गोपाळकृष्णाच्या खेळगड्यानी ही गोष्ट विशेषतः लक्षात ठेविली पाहिजे. उगाच कॉलमच्या कॉलम खरडून लेखणीस शीण देण्यात काही हशील नाही. यापेक्षा गोखल्यांचे पत्र पहिल्याने प्रसिद्ध करा त्यात रा. टिळकावर केलेले आरोप खरे असतील तर ते आनंदाने कबूल करतील. ताक मागावयास येऊन भांडे लपविण्यात काही हशील नाही. भांडे