पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ लो० टिळकांचे चरित्र भाग दें तुम्हीच सांगा की हे पिस्तुल रसायनविद्या व यंत्रविद्या अशा तीन गोष्टी घेऊन तुम्ही आज आपल्या गावी परत चालला आहात. मग तुम्ही स्वतः त्यांचा उपयोग काय करणार आहात ! पाहुणा - प्रथम मी यंत्रकलेचा उपयोग करून पाहणार. कारण काही असले तरी मला जगले हे पाहिजे. आणि चरितार्थ चालविता चालविता इतर दोन विद्यांचा उपयोग मला किंवा लोकाना काय करून देता येईल तो देईन. टिळक - पण तुम्ही तरी ही बंडाची तयारी करता आहात असे मी म्हणू का? पण मी हे आज कशाला बोलू १ तुम्ही आज गावी जा. यांत्रिक कारखाना सुरू करा. संसाराच्या मागे लागा. आणि पांच वर्षांनी पुनः भेटा म्हणजे याच विषया- वर बोलू, असे मात्र समजू नका की तुमच्या अंगातील तेज व धाडसीपणा यांची किंमत मी करीत नाही. पण तुमचे विचार कृतीत उतरण्याला या देशात किती मोठ्या मर्यादा आहेत, तुमचे पिस्तुल गंज खात कसे पडेल, आणि तुमच्या रसा- यनविद्येला लायक विद्यार्थी किती मिळतील हे तुमचे तुम्हालाच कळून येईल हाच माझ्या बोलण्याचा अर्थ. आमच्या वेदांतातलेच उदाहरण तुम्हाला देतो. आत्मा हा शुद्ध बुद्ध व चैतन्यात्मक आहे ही गोष्ट खरी. तथापि त्याला जड देहा- चाच आश्रय करावा लागतो. त्याप्रमाणे बंडखोरीची बुद्धि हा स्वातंत्र्याचा आत्मा खरा. तरीपण त्याला नित्यस्वरूपाच्या राजकारणाच्या जडदेहाचाच आश्रय करावा लागतो. राजकारणाचे हे नित्यकर्म सहजच रुक्ष नीरस नाशवंत असे वाटते. पण त्याचा आधार घेतल्याशिवाय बंडखोरी ही फळाला येत नाही. आता मनुष्यात्मे तितके सगळे देहधारीच असले तरी मनुष्या मनुष्यात फरक असतोच. म्हणूनच अधम तो अधम व साधू तो साधू. त्या रीतीने राजकारणातहि सर्वच काही एका माळेचे मणी असत नाहीत व असून चालणारहि नाही. मी जन्मात पिस्तुलाला किंवा बंदुकीला हातहि लावलेला नाही. तरीपण सात वर्षे तुरुंगात जाऊन येऊन मी एवढे तरी सिद्ध केले असेन की अत्याचारीपणा नसताहि राज- कारण थोडेबहुत तीव्र होऊ शकते. मी हे अहंकाराने बोलत नाही. पण राज- कारणाच्या नित्यकर्माला मी किती महत्त्व देतो हे दर्शविण्याकरताच हे बोललो. खरोखर मनात भीति न धरता मी स्पष्टपणे प्रजेच्या न्यायनिष्ठ हक्कासंबंधाने बोलत आलो यापेक्षा मी वास्तविक अधिक पराक्रम तरी कोणता केला ? पण लोकामध्ये अजून ही साधी गोष्टहि आली नाही. येवढ्याचकरिता ते मला मोठा म्हणतात. माझी इच्छा इतकीच की हा माझा मोठेपणा निघून जावा व मी करतो इतके पुष्कळ लोकानी करावे. कारण माझ्याइतके व माझ्याहून अधिक बुद्धिमान असे लोक या देशात कितीतरी आहेत. मीहि तामसीवृत्तीचा आहे. नाही असे नाही. तुमच्यासारखे माझ्या हाती पिस्तुल असले आणि मी कोठे न सोसवेल असा प्रत्यक्ष वैयक्तिक जुलूम पाहिला तर माझा किंवा इतरांचा स्वाभिमान व अब्रू रक्षण करण्याकरिता मीहि हटकून त्याचा उपयोग करीन व अत्याचारी या नावाला पात्र