पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ त्या पिस्तुलानी स्वातंत्र्य मिळण्याला एक रतीभरहि साहाय्य झाले नाही. उलट अशा एका अधिकाऱ्याचा खून झाला की ज्याच्या मरणाने हळहळ वाटली नाही असा मनुष्य विरळा. पूर्वी बंडखोरीच्या कल्पनेला जो तात्त्विक तजेला होता तोहि या निव्वळ खेदकारक खुनाने जाऊन अशा मार्गाविषयी लोकांच्या मनात खंतीच उत्पन्न झाली. पाहुणा — मग अशा पिस्तुलांचा काहीच उपयोग नाही असे म्हणता का ? टिळक मी तसे म्हणत नाही. स्वाभिमानाचे संरक्षण करण्याचे प्रसंग हिंदी प्रजेवर अनेक वेळा येतात. अशा वेळी म्हणजे एखाद्या न्याय्य प्रसंगी सर्वांना खरोखर जुलुमी वाटणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध, पण तेहि प्रत्यक्ष जुलुमाच्या कृत्यात प्रतिकार करताना, जर एखाद्या पिस्तुलाचा उपयोग झाला तर तो लोकाना पटेल. आणि मग पिस्तुल कोणी कसे मिळविले याचा विचार लोक करणार नाहीत. पाहुणा – पण पिस्तुलाचे एक असो. इकडे लोकाना बाँबगोळे करता येऊ लागले होते त्याला तर परदेशी जाण्याचे कारण नाही ना ? टिळक —— पण जो प्रश्न मी पिस्तुलाबद्दल विचारला तोच मला या बाँब - संबंधीहि विचारता येईल. जनरल डायर सारख्यावर कोणी तो फेकून दाखविला असता तर लोकाना त्याचे काही कौतुक वाटले असते. उलट लॉर्ड हार्डिज यांच्या सारख्या हिंदुस्थानाविषयी खरी सहानुभूति बाळगणाऱ्या व्हाईसरॉयवर तो टाक- ल्याने अद्भुतरस आळविणारी काही वर्णने लोकाना वर्तमानपत्रात वाचावयाला सांपडली पण सुज्ञ जनतेच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला ? याची काही कल्पना आहे काय ? आणि मुझफरपूरच्या अत्याचारात तर बिचाऱ्या दोन गोऱ्या बायाच मेल्या ! माझ्या म्हणण्याचा मुद्दा हाच की ज्या लोकांच्या हाती ही साधने जातात त्या सर्वाचेच शील चांगले असते असे नाही व शहाणपणा तर फार थोड्यांच्या ठिकाणी असतो. म्हणून त्याचा परिणाम विपरीत होतो. पाहुणा म्हणून सुशिक्षित लोकानीच या गोष्टी स्वतःच्या हाती घेतल्या पाहिजेत, टिळक - पण त्यात अडचण ही की बंडाची कल्पना सुशिक्षिताला एक वेळ मानवते पण वैयक्तिक अत्याचार त्याला मानवत नाहीत. याला काय करणार? पाहुणा - पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता तरी कसे येणार ? अंग भिजेल म्हणून पाण्यात पडावयाचे नाही. आणि पाण्यात पडल्याशिवाय पोहता यावयाचे नाही. एकदम प्रथमच पाण्यात पडलेला मनुष्य बुडतो. तो तेथे पोहायला शिकू शकत नाही. टिळक - हे खरे आहे. पण बंडे ही तुम्ही सांगितलेल्या देशांतहि आक- स्मिक उद्भवली ? की पुढे केव्हातरी बंड करावयाचे म्हणून रोज त्यांची थोडथोडी कोणी तयारी करीत होते १ १८५७ साली बंड झाले ते 'उद्भवले' असेच म्हणतात. ते आधी तयारी करून कोणी केले नव्हते. आणि जो नानासाहेब