पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ अत्याचारी लोक व टिळक ११ पाहुणा — म्हणूनच मी म्हणतो की तशी खटपट करून त्या पायरीपर्यंत मजल नेल्याशिवाय हिंदुस्थानचा तरणोपाय नाही. टिळक - पण हिंदुस्थानच्या स्थितीसारखा देखावा तुम्हाला इतर कोणत्या देशात आढळला काय ? पाहुणा — खरेच नाही. संख्येने इतके पुष्कळ लोक इतक्या थोड्या लोकां- कडून आपल्यावर राज्य करून घेतात असा दाखला इतर ठिकाणी मिळणे शक्य नाही. आणि याच मुद्दयावर तर जगातले लोक आम्हाला हंसतात ! टिळक - पण ज्या राष्ट्रानी बंडे करून स्वातंत्र्य मिळविले त्याना इतर एखाद्या राष्ट्राची तरी सहानुभूति नव्हती काय ? व त्या सहानुभूतिपूर्ण राष्ट्रा- कडून युद्धाची साधने मिळाली नव्हती काय ? उदाहरणार्थ इटलीला ऑस्ट्रिया- विरुद्ध लढण्याच्या कामी फ्रान्सची मदत झाली. आज युरोपखंडात लहान सहान राष्ट्रे जिवंत आहेत ती इतर मदतगार राष्ट्रांच्या बळावरच नाहीत काय ? आय- लैंडला पूर्वी फ्रान्सची मदत झाली व अलीकडे अमेरिकेची झाली आहे. दुर्दैवाने हिंदुस्थानाला कोणत्याच राष्ट्राची आज तशी मदत नाही. म्हणून हिंदुस्थानच्या लोकानी बंड करण्याला तयार झाले तरी लढण्याची साधने कोठून मिळणार ? पाहुणा - साधने मिळविण्याच्याच नादाला मनुष्य लागला म्हणजे त्याला ती मिळतात. हे पाहा. माझ्या ट्रंकेत मी सर्व अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून एक पिस्तुल आणलेले आहे. टिळक - पण हे मिळविण्याला तुम्हाला परदेशात जावे लागले तेव्हा तेथून तुम्ही ते आणले. तुम्हाला परदेशी जाऊन येण्याला खर्च किती लागला ? पाहुणा — सुमारे तीन हजार रुपये. टिळक — मग या पिस्तुलाची किंमत तीन हजार रुपये व शिवाय परदेशचा प्रवास हे ठरत नाही का ? असा खर्च करून प्रवास करणारे लोक हिंदुस्थानात किती ? पाहुणा - पण सर्वांना काही असा खर्च आणि असा प्रवास करावा लाग- णार नाही. बंगाल्यात दरोडेखोराना पिस्तुले कशी मिळतात ? बंगाल्यातील अराजक चळवळीत किती तरी पिस्तुले बाहेर निघाली होती ! टिळक-- पण इतकी पिस्तुले बाहेर पडून परिणाम काय झाला? हे पिस्तुल- वाले घरच्या म्हातारचेच काळ ठरले की नाही ? बंगाल्यातील दरोड्यांची वर्णने वाचली म्हणजे त्यात तरुण पिढीचे तेज चमकले असा सकृत्दर्शनी भास होतो. पण त्या दरोड्यांची वर्णने वाचली म्हणजे निरपराधी धनिक लोकांवर झालेल्या क्रूर अत्याचारांचीहि आठवण होते. ती विसरून कसे चालेल? इतकी पिस्तुले बाहेर पडली म्हणता व जर्मनीतून युद्धाच्या वेळी कदाचित् कमीज्यास्त आली ह असतील. पण स्पष्टच बोलावयाचे तर ज्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवावयाचे असे म्हणता अशा लोकांचे बळी किती घेतले गेले ? आमच्या इकडे एकदा १९०९ साली एक डझन पिस्तुले आली पण त्यांचा इतिहास काय झाला हे ऐकाल तर