पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० लो० टिळकांचे चरित्र भाग ८ स्वस्थपणे टिळकानी तुम्ही कोण कुठले बगैरे अधिक विचारपूस केली. तेव्हा खालील संभाषण झाले. पाहुणा - मी गेली दोनतीन वर्षे युरोप अमेरिकेत गेलो होतो. टिळक - कशाला गेला होतात ? पाहुणा — काही नवीन उद्योग धंदा किंवा विद्या शिकावी म्हणून. टिळक – मग काय काय शिकलात ? पाहुणा - काही थोडी यंत्रकला शिकलो काही रसायनशास्त्र शिकलो. टिळक- -मग आता तुम्ही यापुढे काय करणार ? पाहुणा - परत आपले गावी जाऊन किंवा इतर कोठे मिळविलेल्या विद्येचा उपयोग होतो का पाहून संसारयात्रा सुरू करणार. टिळक — तुम्ही परदेशात आपल्या खर्चाने गेला होतात ? किंवा तेथे उद्योग धंदा शिकता शिकताच नोकरी वगैरे करून आपले पोटहि भरलेत ? पाहुणा – केवळ स्वावलंबनाच्या तत्वावर मी विद्या शिकलो व उदर- निर्वाहहि केला. टिळक – मग इतके दिवस तुम्ही परदेशात हिंडला फिरलात तेव्हा इकडच्या व तिकडच्या स्थितीत तुम्हाला काय अंतर दिसले ? पाहुणा - अंतर हेच दिसले की आहे या स्थितीत आमच्या देशाला आणखी पाचशे वर्षे डोके वर काढण्याची आशा नको. टिळक – पण तुम्ही गेलात ते देश आधीच स्वतंत्र व स्वराज्याचा उप- भोग घेणारे असतील. हिंदुस्थानासारखे ते परकी लोकांच्या ताब्यात नसतील. तेव्हा आम्हाला वर येण्याला काही दिवस लागणारच. पाहुणा - पण परकी देश झाले तरी ते पूर्वी केव्हा परतंत्र नव्हते असे नाही. त्याना आज स्वातंत्र्य आहे ते त्यानी स्वत: मिळविलेले आहे. टिळक ते कोणत्या उपायानी १ पाहुणा आपण असला प्रश्न कसा करता ? परतंत्र स्थितीत असता स्वातंत्र्य मिळविण्याचा मार्ग एकच. तो अर्ज विनंत्या हा नव्हे. तर स्वातंत्र्या- करिता प्राण देण्याला व प्राण घेण्याला तयार होणे हाच. टिळक - तुम्ही स्वातंत्र्य म्हणता ते व्यक्तीचे की देशाचे ? पाहुणा - प्राण देऊन किंवा घेऊन व्यक्तिस्वातंत्र्य मिळविणे ही सोपी गोष्ट आहे. पण माझ्या म्हणण्याचा रोख देशाच्या स्वातंत्र्याबद्दलच होता. टिळक – तात्त्विकदृष्ट्या तुम्ही म्हणता हे बरोबर आहे व निरनिराळ्या देशांचा इतिहास पाहिला म्हणजे त्यात अशी एक पायरी कोठे तरी पायाला लागते ही गोष्ट खरी.