पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ अत्याचारी लोक व टिळक तर टिळक लगेच उठून सगळे लॉरिपोर्टस् धुंडाळून त्याला काही आधार काढून देत नव्हते. तर संथपणे त्याची हकिकत ऐकून घेत व चांगलासा वकील पाहून त्याच्याकडे काम दे असे त्याला सांगून वाटेस लावीत. तशीच कल्पना त्याना कोणी अत्याचारी मनुष्य भेटावयाला गेला असताना टिळक कसे वागत अस- तील याबद्दल आपण केली पाहिजे. अर्जावर विश्वास ठेवणारा मनुष्य जसा टिळकां- कडे जाऊन कृतार्थ झालोसे वाटून येई तसेच अत्याचारी मनुष्यहि आपल्या स्वार्थत्यागी व देशाभिमानी वृत्तीचे कौतुक करणारा भेटला असे म्हणून कृतार्थ मानून परत येत असावा. नेमस्त लोकांकडेहि ते गेले असते पण काहीनी त्याना एकदम दरवाजा दाखविला असता व काहीनी त्याना कदाचित् पोलीसच्या स्वाधीन केले असते. मग ते त्यांच्याकडे कशाला जातील ? आपले दुसन्याला न पटो, कदाचित् तो आपल्याला मोडूनहि काढो, पण आपले ऐकून घेतले आप- ल्याशी युक्तिवाद केला येवढ्यानेहि मनुष्याचे समाधान होत असते. व तितके समाधान अत्याचारी लोकाना टिळकांपासून मिळत असेल असे कोणी म्हटले तर ते मात्र योग्य होईल. पण या वरील सर्व विवेचनात अत्याचारी याचा अर्थ एखादा घातपात करून खासगी संरक्षणासाठी आलेला किंवा प्रत्यक्ष अत्या- चाराच्या कृत्याला निघालेला असा घ्यावयाचा नाही. आणि खरे पाहिले असता असा मनुष्य दुसऱ्याकडे सहसा जातहि नाही. खरे कार्य- प्रवण लोक दुसऱ्याचा सल्ला घेत बसत नसतात. आत्मस्फूर्ति हाच त्यांचा खरा गुरु असतो. आणि ज्यानी प्रत्यक्ष गुन्हा केला ते लोक पकडले तरी जातात किंवा दडून छपून बसतात किंवा देशत्याग करतात. टिळकांच्या घरच्यासारख्या खुल्या दरबाराला ते कशाला जातील ? येऊन जाऊन तीव्र प्रतिकाराचा मार्ग हा देशसेवेचा एक मार्ग असे विचार ज्यांच्या डोक्यात घोळत असतील - म्हणजे जे अजून विचाराच्या विवेकाच्या सल्लामसलतीच्या युक्तिवादाच्या किंवा उप- देशाच्या कक्षेत असतील असेच लोक कदाचित् टिळकाकडे जावयाचे. व असे लोक त्यांच्याकडे गेले असताना रजोगुणी व प्रवृत्तिमार्गी टिळक नित्य कर्माला महत्त्व देणारे टिळक त्याला अत्याचाराला प्रवृत्त न करता बहुधा निवृत्तच करीत असावेत असे अनुमान कोणीहि करील. हीच गोष्ट थोडीशी खुलासेवार सांगण्याकरिता अशा लोकाशी होणाऱ्या त्यांच्या संभाषणाचे एक वर्णन आम्ही खाली देतो. पण ते वास्तविक घडलेले असेहि आम्ही सांगत नाही किंवा निव्वळ काल्पनिक अशीहि खातरजमा आम्ही करीत नाही! एके दिवशी परदेशाहून आलेला एक पाहुणा टिळकांकडे उतरण्याला आला. गावात कोणाची ओळख नाही आणि टिळक सर्वांचा परामर्ष घेणारे म्हणून तो त्यांच्याचकडे जाऊन उतरला. पाहुणा घरी आला तेव्हा यजमानाचे कर्तव्यच की त्याला उतरून घेऊन जेवावयाला घालावे. जेवणखाण झाल्यावर