पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो. टिळकांचे चरित्र भाग ८ अमुकच व्यक्ति असे मात्र नव्हे. सरकारला उद्देशून नेमस्त कौन्सिलात हे बोलले म्हणून गावात ते कोणी ऐकले नाही असे झाले का ? आणि ज्यानी ज्यानी ते ऐकले त्या सर्वाच्याच कानावरून ते वायाच्या झुळुकेप्रमाणे निघून गेले काय ? कोणाच्याहि मनात ते शिरले नसेल ? कोणाच्याहि तामसी वृत्तीला त्याने यत्किं - चितहि उत्तेजन दिले नसेल ? पण असे मानणे म्हणजे नेमस्तांची ती स्तुति होत नाही तर निंदा होते. मुद्दा हा की असले शब्द नेमस्त बोलले तर ते अत्याचारी ठरत नाहीत व टिळक तेवढे अत्याचारी ठरतात हे कसे ? ते कौन्सि लात एकदा बोलतात व टिळकाना दहा वेळा वर्तमानपत्रात लिहावे लागते किंवा दौन्यात व्याख्याने द्यावी लागतात. पण हेतूशिवाय अशा निव्वळ पुनरुक्तीने दोषारोप सिद्ध होत नाही. टिळकांचा धंदा वर्तमानपत्राचा व स्वीकारलेला उद्योग चळवळीचा म्हणून त्याना ही पुनरुक्ति करावीच लागत होती. (३) अत्याचारी लोक व टिळक राहता एकच मुद्दा राहिला तो हा की अत्याचारी चळवळीत सापडलेले लोक नेमस्तांपेक्षा टिळकांच्या सान्निध्यात अधिक आढळत. काही अंशी ही गोष्ट खरी आहे. पण तित्राहि विचार थोडा सूक्ष्मपणानेच केला पाहिजे. पहिला विचार असा की जे असे लोक टिळकाना भेटत त्याना टिळक बोलावणे तर पाठवत नसतच. पण पुष्कळदा ते त्यांच्या परिचयाचेहि नसत. मग ते नेमस्ताकडे न जाता टिळकाकडेच का जात ? तर याचे उत्तर असे की टिळकांचे धैर्य टिळकांचे सरकारशी बाणेदार वर्तन टिळकांचा स्वार्थत्याग व टिळकांची राजकारणातील धडाडी हे त्यांचे गुण पाहून असले लोक मोहून जात. शिवाय स्वभावतः टिळक मनुष्यघाणे नव्हते. त्यांच्या घरी पहारा नव्हता. त्यांना व्हिझिटिंग कार्ड पाठवून भेटावे लागत नसे. किंवा आधी वेळ ठरवून मग जावे लागत नसे. आपला वेळ खर्चून प्रत्येकाचे ऐकून घेऊन त्याच्याशी शक्य तितके समरस होऊन व त्याच्या- करिता शक्य तितकी झीज सोसून टिळक त्यांजकडे जाणाराचे काम करीत म्हणूनच लोक त्यांजकडे जात. याविरुद्ध सर्व गुण ज्यांच्यामध्ये त्यांच्याकडे हे लोक कशाला जातील ? टिळकाना दोहोच्या ऐवजी चार हात नव्हते किंवा त्यांच्या दिवसाचे तास चोविसाऐवजी अठ्ठेचाळीस नव्हते म्हणून लोकांचेहि काम करण्याला त्याना काही मर्यादा होत्या ही गोष्ट खरी. तरी पण पुष्कळ शिक्षितच काय पण अशिक्षित लोका- नाहि असा आपल्या ठिकाणी दृढ विश्वास होता की आपण टिळकाकडे गेलो तर ते आपले काही तरी काम करतील. अर्थात् ज्या भावनेने संसारव्यवहारातील आर्त लोक टिळकांकडे जात त्याच भावनेने देशाभिमानी अत्याचारी लोक टिळकांकडे जात. पण स्वार्थी लोकांचे काम तडीस न्यावयाला जितकी मर्यादा होती तितकीच अत्याचारी लोकांचे काम होण्यालाहि ही भावना टिळकांच्या लोकसंग्राहक बुद्धिमुळे व ते लोक- संग्रह करतात या कीर्तिमुळे उत्पन्न होत असे. कायद्याचा मुद्दा विचारायला कोणी गेला