पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ कडक टीका हा अत्याचाराचा उपदेश नव्हे ७ खंडा होता. डॉ. राशविहारी घोस हे नेमस्त पण 'सिडिशिअस मीटिंग्स बिला'चे वेळी त्यानी भर कौन्सिलात सरकारला बजावले की, "सांभाळा अशाने तुम्ही हिंदु- स्थानाला आयर्लंड बनवाल." येथे त्यानी 'आयलैंड ' हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला ? राजनिष्ठेचे गाणे गाणाऱ्या बेलफास्टमधील लोकाना उद्देशून १ किंवा सह- कारितेची चळवळ करून आयर्लंडची सांपत्तिक सुधारणा करणाऱ्या सर होरेस प्लंकेटला उद्देशून ? की शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या रोमन कॅथोलिक पाद्रयाना उद्देशून ? की कृषिशास्त्रात नव्या कल्पना काढून आयर्लंडच्या लोकाना दोन घास अधिक खावयाला मिळावे अशा सात्विक परोपकारकर्त्यांना उद्देशून ? की मॅटन- सारख्या निवळ तरतरित वाक्पंडिताला उद्देशून ? की आयझॅक बट सारख्या शुद्ध पार्लमेंटरी चळवळ करणान्याला उद्देशून ? की पार्नेलसारख्या लँडलीगची चळवळ करणाऱ्या इंग्रजद्वेष्ट्याला उद्देशून १ असे कितीहि प्रश्न विचारले तरी ते व्यर्थ होत. कारण त्यापैकी एकातूनहि खरे उत्तर मिळणार नाही. खरे उत्तर हेच की हिंदुस्थानाला तुम्ही दुसरा आयर्लंड बनवाल असे म्हणणाऱ्या डॉ. घोस यांच्या डोळ्यापुढे आयर्लंडातील अत्याचारी लोकच असले पाहिजेत. एका 'आयर्लंड' या शब्दात सरकारच्या डोळ्यापुढे त्या दुर्दैवी देशातील भांडखोरी जाळपोळ हाणामार खून या विविध अत्या- स्वारांचेच शब्दचित्र डॉ. रासबिहारी याना ढळढळीतपणे उभे करावयाचे होते. मग त्याना अत्याचारप्रतर्वक्र का म्हणू नये ? ते हे शब्द काही एकाद्या अधिकान्याच्या कानात कुजबुजले नव्हते. त्यानी त्या शब्दांचा डंका भर कौन्सिलात उभे राहून वाजविला होता. सर्व देशातल्या वर्तमानपत्रानी ते भाषण छापले. बंगाल्यातील यच्चयावत् भावनाप्रधान तरुण लोकानी ते वाचले. बंगाल्यातील अत्याचारी लोकानी ते वाचले. मग ते भाषण काय फुकट गेले असेल ? कल्पनाच करावयाची तर निदान चार दोन तरुण लोकांची तरी नाडी ते वाचून अधिक जलद चालू लागली नसेल काय ? चार दोन लोकानी तरी पिस्तुलांची किंवा बाँब गोळ्यांची उठाठेव केली नसेल काय ? चार दोन लोकानी तरी पिस्तुले पैदा करण्याचा प्रयत्न केला नसेल काय ? 'हिंदुस्थान आयर्लंड होईल सांभाळा' ही दहशत काय फुकटच गेली असेल ? मग बोलण्याला अर्थच नाही म्हणावयाचा. पण हे सर्व घडले असले तरी रासबिहारी याना कोणी अत्याचारप्रवर्तक म्हणत नाही. पेटलेल्या चुलीतील ठिणगी वाऱ्याने गंजीतल्या एखाद्या पेंढीवर जाऊन पडावयाचीच. पण ती पडली म्हणून स्वयंपाक्याला कोणी आगलाव्या म्हणत नाही. कारण तेथे तसा हेतू नाही. रासबिहारी घोस यानी आयर्लंडचे नाव घेतले तसेच इतर नेमस्तानी तीच गोष्ट अनेक वेळा पर्यायाने म्हटलेली आहे असे दाखावता येईल. कोणी म्हणतो " असंतोष माजेल. " कोणी म्हणतो " असंतोष भुईत खोल जाईल. " कोणी म्हणतो "परिणाम भयंकर होतील, पण सगळ्यांचा अर्थ एकच. तो हाच की, 'तुम्ही असे असे कराल तर लोक असे असे करतील. '