पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

० टिळकांचे चरित्र (२) कडक टीका हा अत्याचाराचा उपदेश नव्हे भाग ८ त्यांना मनात तसे खरोखर वाटत नसते तर त्यानी तसे बोलावे याला काही कारण नव्हते. टिळक सरकारावर कडक टीका करीत टाकून बोलत हे सगळे खरे असले तरी त्यांच्या लेखात किंवा भाषणात अत्याचाराचा उपदेश कोणा सहि काढून दाखविता येणार नाही. म्हणजे प्रगट तर नव्हेच पण प्रच्छन्नहि नाही. येऊन जाऊन दोन खटल्यातील झालेल्या शिक्षेवरून तसे कोणी अनुमान काढील तर त्याला इतकेच म्हणावयाचे की खटले कोणत्या परिस्थितीत झाले व टिळ- काना कोणाच्या बहुमताने दोषी ठरविण्यात आले हे प्रसिद्धच आहे. सरकाराने टिळकाविषयी काय म्हटले किंवा अँग्लोइंडियनानी काय म्हटले या दृष्टीने या चर्चेच्या प्रसंगी आपणास पाहावयाचे नाही. तर सुज्ञ जनता काय म्हणते या दृष्टीने पाहावयाचे आहे. ज्या लेखाकरिता १८९७ चा खटला टिळकांवर झाला ते लेख किंवा टिळक हे अत्याचारी आहेत असे लोकाना वाटते तर त्यांच्याकरिता जाहीर- रीतीने एवढा डिफेन्स फंड झालाच नसता. किंवा रँडसाहेबांच्या खुनात टिळकांचे अंग आहे असा कोणास संशय असता तरीद्दि एवढा फंड जमला नसता व त्यात नेमस्त लोकानी वर्गणी दिली ती तरी दिली नसती. १८९७ च्या खटल्यातील लेखाना सदभिरुचिच्या दृष्टीने कोणी नावे ठेवो किंवा त्याना ग्राम्य अथवा फाजील भावनाप्रधान म्हणो. परंतु ते अत्याचारप्रवर्तक असे कोणीच म्हटले नाही. दुसऱ्या खटल्याच्या वेळी थोडे दुमत होते. व दुमतापेक्षाहि भीति अधिक होती. तथापि नुसते दुमत म्हटले तरी मुद्दयाची एक गोष्ट लोकाना माहीत होती की, पहिल्या लेखात नाव ठेवण्यासारखे काहीच नव्हते व दुसरा लेख १८९७ च्या लेखाप्रमा- णेच स्वतः टिळकानी लिहिलेला नव्हता. सरकारी खटल्यात ही गोष्ट पुढे कशी येणार ? व सरकारास ती कदाचित् माहीत असली तरी ते टिळकाना काय म्हणून सोडतील १ पण फिरून हेच सांगतो की ही चर्चा आम्ही सरकारच्या दृष्टीने करीत नाही तर लोकांच्या दृष्टीने करतो. म्हणून लोकांच्याच दृष्टीने असे म्हणतो की दोन वेळा टिळकाना शिक्षा झाली येवल्यावरून ते अत्याचारी असे कोणासहि म्हणता येणार नाही. स्वतः त्यांचा असा लेख किंवा त्यांचे असे भाषण दाखलच नाही की ज्यात त्यानी लोकाना अत्याचाराचा उपदेश केला आहे. तसे असते -तर सरकार त्याकरिता खटला केल्याशिवाय कधीच न सोडते व ज्याकरिता खटले झाले ते लेख त्यांचे नव्हते. टिळकांच्या लेखातले किंवा भाषणातले एखादे वाक्य अत्याचाराच्या दृष्टीने कडकपणाचे म्हणून काढून दाखविले तर तशी वाक्ये इतर पुष्कळांच्या फार काय पण कित्येक नेमस्तांच्याहि भाषणातून व लेखातून काढून दाखविता येतील. दिनशा वाच्छा हे आता नेमस्त गणले जातात पण त्यांचे पूर्वीचे लेख कोणीहि काढून पाहावे. कडक लिहिणे बोलणे हा त्यांचा हात-