पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग टिळकांचा जाहीरनामा स्वराज्य द्या असे म्हणण्यापेक्षा आम्ही युद्धात मदत केली आहे म्हणून द्या, हे सहजच अधिक सयुक्तिक ठरणारे होते. याकरिता कलकत्त्याच्या चतुःसूत्रींतील स्वराज्याचे सूत्र तेवढे अखंड राखून बाकीची सूत्रे त्यानी आवरून प्रसंगावधानाच्या कांडीभोवती गुंडाळून ठेवली होती. १९०६ साली देखील ते अत्याचाराचा उपदेश करीत नव्हते हे नाशिक व बेळगावच्या पुराव्यावरून सिद्ध होत असल्याचे आम्ही पूर्वीच दर्शविले आहे. मग जे टिळक क्षोभाच्या उत्कट स्थितीत व चळवळीच्या ऐन जोरात अत्याचाराविरुद्ध बोलत होते ते मंडालेहून परत आल्यावर वरच्या- सारख्या बदललेल्या परिस्थितीत त्याचा उपदेशच नव्हे तर मनात विचारहि कर- णार नाहीत ही गोष्ट स्वाभाविक होय. जॅक्सन साहेबांचा खून आणि बारा पिस्तुलांचा खदास्पद इतिहास लक्षात घेऊ- नच त्यानी अत्याचारांचा निषेध केला असला पाहिजे. हा खून व हा इतिहास न घडता व महायुद्धाची एक वेगळ्या प्रकारची संधि न येती तर टिळक जाहीरनाम्यात अत्या- चारांचा निषेध अशा रीतीने नच करते, पण परिस्थितिच अशी होऊन बसली की त्याना आपली खरी तत्त्वे प्रगट करणे भाग पडले. जो तो आपल्या स्वभावा- नुसार वर्तत असल्यामुळे कोणाचा कोणाला व्यक्तिशः निषेध करण्याचा अधिकार नाही असेच टिळकांचे सामान्य मत होते. एखाद्याने चुकीने का होईना पण देशाकरिता कोणत्यादि प्रकारचा स्वार्थत्याग केला तर निंदेने त्याला दुखवावयाचे नाही असेच त्यांचे नेहमीचे धोरण होते. आणि या जाहीरनाम्यात अत्याचाराचा निषेध करतानाहि अशा कोणा व्यक्तीची निंदा करणे त्यांच्या मनात नव्हते, तर हिंदुस्थानात राजकारणी पुरुषांचे धोरण सामान्यतः व या विशेष प्रसंगी काय असावे हेंच त्याना विशेषतः सांगावयाचे होते. बरे, एखाद्या अत्याचारी देशभक्ताला जाहीरनाम्यातील या निषेधाचे वाईट वाटले असे घेऊन चालले तरी त्याचा तरी टिळ- कांवर असा काय शक होता की योग्य वाटल्यास टिळकानी त्याचा निषेध करू नये ? त्याला टिळकानी अशी काय भर दिली होती व व्यक्तिश: उत्तेजन दिले होते की त्याची भीड किंवा भीति टिळकानी मानावी १ एखादी गोष्ट एखाद्याला कर म्हणून सांगितले तरच त्यामुळे त्याचा निषेध करण्याच्या कामी मिंधेपणा येतो कारण गोष्ट करावयाला सांगून वरती निषेध करणे हे अधमपणाचे ठरते. तसेच भ्याड लोक जो निषेध करतात तसाहि टिळकांचा होता असे म्हणता येत नाही. त्यांच्यावर इतर दोषारोप केले गेले पण टिळक भिले असे कोणी कधीच म्हटले नाही. ते एकदा सोडून तीनदा तुरुंगात जाऊन आले होते व या शेवटल्या वेळी तर पूर्ण सहा वर्षे म्हणून टिळकाना अत्याचारीपणा वाईट असे म्हणावयाचे असल्यास कोणाच्या देवाचीहि भीति नव्हती. ई. म. म. द. वा. पोतदार पंथ संग्रह