पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ गुप्तचिन ४९ वाटत होते आणि तसे वाटणे काही विनाकारण किंवा गैरहि नव्हते. आता विघ्न कसे आले ते पाहा. गुप्तविघ्न ज्या ना. गोखल्यानी कॉन्स्टिटयूशनमधील दुरुस्तीच्या ठरावाचा मसुदा विझांटवाईस करून दिला होता त्याच नामदार गोखल्यानी ता. १४-१५ डिसें- बरच्या सुमारास एक 'गुप्त पत्र' भूपेंद्रनाथ बसू यास लिहिले. यात समेट मोड- ण्याचे कारण असे दाखविले होते की रा. टिळक हे “सरकारला बहिष्कार घाल- णारे" व "आयरिश लोकाचे मार्ग स्वीकारणारे" आहेत, असे त्यानीच सुवारावास सांगितले असल्यामुळे त्यांच्याशी 'समेट' करणे योग्य नाही !' या पत्रात दुस- राहि कांही नालस्तीचा मजकूर असावा असे वाटते. कारण ते पत्र सब्जेक्ट कमिटी पुढे ठेवण्यास योग्य नाही, असे भूपेंद्रनाथ बसू यास वाटून त्यानी याऐवजी लोकास दाखवावयास दुसरे पत्र पाठवा, असे ना. गोखल्यांना कळविले व त्या- प्रमाणे लेखणी सावरून ना. गोखल्यानी दुसरे पत्रहि पाठविले, या गोष्टी आता जाहीर झाल्या आहेत ना. गोखल्यानी हे पत्र पाठविले इतकेच नव्हे तर, समेटाबद्दलचे बोलणे सब्जेक्ट कमिटीत हाणून पाडण्यासाठी येथून आपल्या शिष्यांपैकी काही मंडळीस डेलिगेट म्हणून मद्रासेसहि पाठविले होते. सब्जेक्ट कमिटीत हा विषय जेव्हा प्रथम आला तेव्हा समेटास बहुतेक मंडळी अनुकूल होती. पण ना. गोख- ल्याच्या पत्रातील विचार भूपेंद्र बाबूंनी जेव्हा सब्जेक्ट कमिटीस कळविले. तेव्हा सब्जेक्ट कमिटीत सर्वांची अशी समज झाली की रा. टिळक हे " सरकारला बहिष्कार टाकणारे" म्हणजे " Boycott of Government " करणारे आहेत. विझांटबाईची हीच समजूत झाली होती, म्हणून त्यानी रा. टिळक याजपासून याबद्दल तारेने खुलासा मागविला आणि " मी सरकारला बहिष्कार टाकावा असे कधीच म्हटले नाही, राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख लोक म्युनिसिपालिट्यातून वगैरे कामे करीत आहेत. " असा जेव्हा रा. टिळकानी तारेने जबाब दिला तेव्हा बिझांटबाईनी ती तार दुसरे दिवशी सब्जेक्ट कमिटीत वाचून दाखविली. तार वाचून दाखविल्यानंतर ना. भूपेंद्रनाथ बसू यानी ना. गोखल्यांच्या पत्राच्या आधारे रा. टिळकावर केलेला आरोप प्रसिद्धपणे परत घेऊन दोनतीनदां त्याबद्दल सब्जेक्ट कमिटीत उघड दिलगिरी प्रगट केली. पण गुप्त पत्राचा जो गुप्त परिणाम झाला होता तो कायमच राहिला, आणि समेटाचे बोलणे अजिबात रद्द होण्या- ऐवजी कमिटी नेमून कालावधीवर ढकलण्यात आले. याप्रमाणे खरी हकीकत आहे. व त्यात कोणी सप्रमाण एखादी चूक दाखविल्यास आम्हास वाईट न वाटतां उलट समाधानच होईल. पण आम्ही जी चौकशी केली आहे तीवरून हे समा- धान आम्हास केव्हा तरी मिळेल अशी आम्हास आशा नाही. समेटाचे बोलणे मोडण्यास गोखल्यांच्या गुप्त पत्रापासून सुरुवात झालेली आहे ही गोष्ट