पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ लौ० टिळकांचे चरित्र भाग ८ विला होता त्यांच्या अभिप्रायावरूनच करावा लागला असता. आणि अशाहि लोकानी मनाने व कृतीने कबुली दिली होती की फुटकळ अत्याचारी कृत्यानी दहापाच लोकांच्या तेजस्वी वृत्तीचे समाधान होत असले तरी एकंदर समाजाला उपदेशण्यासारखा तो मार्ग नव्हे कारण तो त्याला झेपण्यासारखा नाही. किंबहुना आज एकान्तिक अनत्याचाराच्या उपदेशाविषयी राष्ट्राचा जो अभिप्राय तोच त्या पूर्वीच्या दहा पाच वर्षातील अत्याचाराच्या उपदेशावि- वीहि होता. उगाच तात्त्विक दृष्ट्या बोलावयाचे किंवा नुसती बोलण्याची हौस फेडावयाची तर एखाद्या वाक्पंडिताला असे म्हणता आले असते की, ""देशात गोरा शिपाई एकहि उरला नाहीं, काळे सैन्यहि परदेशात पाठविण्यात आले, यापेक्षा बंड करण्याला अधिक सोयीची संधि दुसरी कोणती मिळणार ?" पण बंड हे तोंडाने होत नसते किंबहुना निःशस्त्र प्रजेच्या मनानेहि होत नसते. १८५७चे बंड झाले ते ज्यांच्या हातात हत्यारे व लष्करी सामुग्री मिळाली होती त्यानी केले. ते शिपायांचे बंड होते नागरिकांचे नव्हते ही गोष्ट कोणालाहि माहीत आहे. त्या सशस्त्र बंडखोर शिपायाना नागरिक साहाय्य झाले असते व संस्थानिक अनु- कूल असते तर बंड यशस्वी होण्याचा थोडा तरी संभव होता असे म्हणता येईल. पण त्यावेळचे सैन्य आज जागेवर नाही. संस्थानिकांची तेव्हाची मनोवृत्तीहि आज नाही. आणि नागरिक तर जुनी राज्ये मोडून इंग्रजांच्या हाती गेली त्यावेळी होते तसेच ते आज. किंबहुना जुन्या स्वराज्याची आठवणहि विसरलेले. भौतिक सुधार- णानी अधिक सुखावलेले, चैनीच्याच काय पण आवश्यक परदेशी वस्तूंनी घेर- लेले. पिढ्यानपिढ्या तेजोद्दीन झालेले. आणि पूर्वीहून अधिक निःशस्त्र बनलेले. अर्थात् महायुद्धाचा फायदा घेऊन बंड करावे हे म्हणणे लहरी तर्कटी विक्षिप्त लोकाशिवाय इतर कोणालाहि पटण्यासारखे नव्हते. येऊन जाऊन उरला मार्ग मामुली राजकारणाचा. पण त्यातहि यावेळी सामोपचारानेच अधिक लाभ होण्या- सारखा असे टिळकांच्या धूर्त बुद्धीला दिसत होते. याची कारणे आमच्यामते उघड आहेत. बंगालची फाळणी रद्द होऊन बंगाल थंड पडला होता. ज्याच्याशी सहानुभूति दाखविण्याकरिता म्हणून इतर प्रांतात तेव्हा चळवळ झाली त्या प्रांताचाच राग शांत झाला व गा-हाणे मिटले असे झाल्यावर, स्वतःचे तसेच काही गा-हाणे असल्याशिवाय शिळ्या कढीला ऊत आणून कसा येणार ? बहिष्काराची चळवळ तेव्हांहि सार्वत्रिक नव्हती व होती तीहि थंडावली होती. राष्ट्रीय शिक्षण बंगाल्यात फार पुढे गेले नव्हते. आणि इकडे वऱ्हाडांत नुसत्या धाकदपटशाने आणि मुंबई इलाख्यात समित्यांचा कायदा लावून सरकाराने बंद केले होते. तात्पर्य १९०७-०८ साली क्षोभाची जी कारणे होती ती टिळकांच्या सुटकेच्या वेळा कमी झाली होती. येऊन जाऊन चतुःसूत्री पैकी स्वराज्याचे ध्येय हे उरले होते. पण टिळकानी या जाहीरनाम्यांत ते सोडून दिले नव्हते इतकेच नव्हे तर स्पष्ट उच्चारून दृढच केले होते. नुसते