पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ टिळकांचा जाहीरनामा कोणत्याहि जिवंत समाजाला काही काळ राग येणे स्वाभाविक हे जरी टिळकाना मान्य होते तरी नित्यप्रवृत्तीचे ते लक्षण नव्हे हेच त्यांचे स्वतःचे पूर्वचरित्र दाखविते. झोपेतून मनुष्य जागा झाला तर त्याची मनःस्थिति प्रथम तरी समाधानाची व शांतवृत्तीची असते. सहा वर्षांच्या निद्रेतून टिळक परत आले व रिप वॅन विकलप्रमाणे त्याना आपला जुना समाज व जुने राष्ट्र ओळखू न येण्यासारखे दिसले तेव्हा त्यांची प्रथमची वृत्ति झोपेतून उठलेला मनुष्य जसा हळूहळू पावले टाकीत चालतो व आजूबाजूला बघत जाते तशीच झाली असल्यास नवल नाही. समाजाने तेज किंवा ओज दाखवावयाचे त्याला झाले तरी नैमित्तिक क्षोभ व त्यातूनहि राष्ट्रात जवळजवळ ऐकमत्य असावे लागते ही गोष्ट त्यांच्या मनाला नेहमी पटलेली असे. जहाल लोकांच्या भूमिकेवर नेमस्तांचे शहाणपण व मुत्सद्दीगिरी खुलून दिसो, किंवा नेमस्तांच्या भूमिकेवर राष्ट्रीय पक्षाचा स्वार्थत्याग व तेज खुलून दिसो. पण तापत्यावरील रंग चकाकण्याला जसे दोन रंगाचे धागे म्हणजे एक रेशीम व एक सूत यांचा एकजीव होऊन अखंड वस्त्र बनावे लागते, त्याप्रमाणे त्रिगुणात्मक गुणांच्या विलासाचे कौतुक, स्वकीयाना काय किंवा परकीयाना काय, वाटावयाचे तर त्रिगुणात्मक गुणांचा समाज एकजीव व एकाच कार्यात प्रवृत्त असला पाहिजे असे त्यांचे मत असे. शिवाय महायुद्ध सुरू झाले होते त्यामुळे तर टिळकाना दिसून आले असले पाहिजे की नेहमीच्या घोरणापेक्षाहि प्रजेने यावेळी सरकारशी थोडे अधिक सामा- पचाराने वागणे हेच श्रेयस्कर. सरकार अडचणीत सांपडले याचा फायदा तामसी- वृत्तिपेक्षा राजसवृत्तीच अधिक मिळवील असे त्यांच्या कार्यकुशल मनाला वाटले असले पाहिजे. तिकडे महायुद्ध पुकारले गेले असता इकडे बंड यशस्वी होण्याची आशा असती तर एक गोष्ट वेगळी होती. पण ती आशा टिळकानाच काय पण कोणत्याहि प्रांतातील अत्याचारीवर्गालाहि वाटत नव्हती. उलट कोठे तशा प्रका- रची थोडीशी हालचाल झाली तर, ज्यानी आपल्या स्वतःच्या देशात डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्ट लावून अधिकारीवर्गाला बेसुमार अधिकार दिले ते लोक इकडे युद्धाच्या निमित्ताने तसेच अधिकार नोकरशाहीला देणार हे उघड होते. टिळकानी यावेळी महायुद्धाचा फायदा घेऊन एखाद्या बंडाचे पुढारी व्हावयास पाहिजे होते असे एका दोघा 'शहाण्या' विद्वानांचे मत असल्याचे आम्हाला ठाऊक आहे. पण खोलीत बसून कल्पनेचे तारे तोडणाऱ्यांचे ते विचार होते. स्वतः त्यांचे धैर्य पाहिले तर इतके होते की चुकून मोकळेपणाने सरकाराविरुद्ध लिहि- लेले त्यांचे एक दोन कागद दुसऱ्याच्या हाती राहिले ते परत मागण्याकरिता त्यानी जिवाचे रान केले आणि ते कागद जाळले गेले असे जेव्हा त्याना कळले. तेव्हा त्यांचा जीव थंडा झाला ! देशात बंड शक्य आहे की नाही याचा खरा अंदाज अशा लेखनीपंडितांच्या अभिप्रायापेक्षा ज्यानी तामसी वृत्तीची का होईना पण काहीतरी धाडसाची कृत्ये केली होती व आपला जीव धोक्यात घालून दाख-