पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ लो. टिळकांचे चरित्र भाग ८ पसरलेली होती असे दिसले. ज्या गोष्टी होऊ नयेत त्या झाल्या व ज्या होणे अवश्य होत्या त्या झाल्या नाहीत. जॅक्सनसाहेबाच्या खुनाची बातमी परत आल्या- वर त्याना कळली. ती ऐकून त्याना मनापासून वाईट वाटले असेल याविषयी कोणीच शंका घेणार नाही. जॅक्सनसाहेबांचा अधिकारी या नात्याने दुलौकिक नव्हता हे त्याना माहित होते. इतकेच नव्हे तर ते शांत स्वभावाचे सात्त्विकवृत्तीचे, आणि त्याहिपेक्षा टिळकासारख्याना विशेष सादरसहानुभूति वाटण्याचे कारण म्हटले म्हणजे ते अखंड विद्याव्यासंगी व संस्कृत पंडित होते. अर्थात् त्यांच्या खुनाला त्यांच्याविषयी राग किंवा अमीति वाटण्यासारखी पार्श्वभूमिका मुळीच नव्हती. आणि ज्या मुलाने खून केला तो कोण कसा होता हे जेव्हा टिळकाना कळले असेल तेव्हा देवाच्या विपरीत लीलेचा त्याना अचंबाच वाटला असला पाहिजे. चाफेकरानी रँडसाहेबांचा खून केला तो वध व गुन्हा या दोन्ही दृष्टीनी अनिष्ट असला तरी, शिस्तीच्या नावाखाली का होईना पण रँडसाहेबानी केलेला जुलूम पाच सहा महिने गाजत होता. व सहेतुक नसले किंवा अजाणता असले तरी त्यांच्या कारकीर्दीने अनेक लोकाना पीडा झाली होती. शिवाय प्लेगच्या जुलुमाविरुद्ध अत्या- चाराचा प्रतिकार एकट्या पुण्यासच झाला असे नव्हे. तर सिन्नर मुंबई तसेच इतर अनेक ठिकाणी दंगे होऊन खून पडले होते. अशा गोष्टींचे तारतम्य टिळकाना कळत नव्हते असे नाही. तात्पर्य कोणी काही तरी केले आणि काही तरी झाले व दडपशाहीचे पाऊल मात्र पुढे पडले या गोष्टीचे त्याना मनापासून वाईट वाटत असले पाहिजे हे कोणीहि कबूल करील. आणि ज्या गोष्टी होत राहाव्या अशी त्यांची इच्छा त्या होत नव्हत्या हे पाहूनहि टिळकाना तितकेच वाईट वाटले असले पाहिजे. कारण प्रत्यक्ष स्थिति काय होती ती पाहा. नेमस्त फुटून निघाले व त्यानी आपली कॉंग्रेस आपल्या मते सुरक्षित केली. पण तिचा प्रवाद उन्हाळ्यातील नदीप्रमाणे तेज व बळ यांनी अगदी सूक्ष्म झाला होता. राष्ट्रीय पक्षाने स्वतः ची काँग्रेस भरविण्याचा प्रयत्न केला ती सरकारी हुकुमाने बंद पडली. आणि इतर परिषदा व सभा या बंद पडून एकंदर नित्य राजकीय चळवळीला उन्हाळ्यात नदीला खांडवे पडतात तसे खांडवे पडले. प्रेस अॅक्टाने वर्तमानपत्रांचे जीव संकटात घातले आणि लोक- मत स्पष्ट रीतीने प्रगट होण्याचा तोहि मार्ग निरुंद झाला. ही एकंदर स्थिति पाहून प्रवृत्तिमार्गी टिळकाना किती वाईट वाटले असेल याची कोणालाहि कल्पना करता येईल, धड हि नाही धड तेहि नाही मिळून जाग्यावर काहीच नाही अशी राज- कारणाची एकंदर स्थिति झाली. अशा रीतीने पुढे कोरी पार्टी आल्यावर त्यावर जवळ जवळ श्रीगणेशाच लिहावयास पाहिजे होता. आणि राजकारणात श्रीगणेशा म्हणजे कायदेशीर सनदशीर चळवळ हाच होय. मनुष्यवृत्तिप्रमाणे राष्ट्रहि विशेष निमित्ताने रागाऊ शकेल. पण राग हे काही मनःस्थितीचे नित्य स्वरूप नव्हे. म्हणून बंगालची फाळणी लेगचा जुलूम असल्या गोष्टीनी