पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ टिळकांचा जाहीरनामा भाग ८ राजकारणाचे मार्ग व अत्याचार टिळकांच्या राजकारणाचा व्याप मोठा. त्यांचा लोकसंग्रह मोठा. आणि चळवळीची तीव्रता कायदेशीरपणाच्या मर्यादेला थेट जाऊन भिडलेली. यामुळे त्यांच्या साधनासंबंधाने अगर मार्गासंबंधाने शत्रूंच्याच काय पण मित्रांच्याहि कल्पना सोळा आणे स्पष्ट नसाव्या यात आश्चर्य नाही. पाहणाराला केव्हा ते जहाल केव्हा ते मवाळ केव्हा कायद्याबद्दल आदर बाळगणारे तर केव्हा काय - द्याला झुगारून देणारे केव्हा सनदशीरपणाचे भोक्ते तर केव्हा बंडखोरीचे गुण आळविणारे असे दिसत. पण एकाच स्वभावाची ती निरनिराळ्या प्रकारची दृश्ये होती. आंतून प्रतिष्ठित-प्रज्ञ व सुस्थिर धोरणाचे असता टिळकांची स्वरूपे इतक्या निरनिराळ्या प्रकारची दिसत याचे कारण ज्या ज्या विशेष प्रसंगी त्यांच्या विशेष भाव- नांचा आविर्भाव तीव्रतेने दिसत असे त्या त्या विशेष प्रसंगी त्यांचे विचार त्यांची वागणूक त्यांचे लिहिणे त्यांचे बोलणे हे एकाच कल्पनेभोंवती फिरते राही. यामुळे त्या कल्पनेचे ते एकनिष्ठ उपासक असा भास होई. पण हे आविर्भाव नैमित्तिक म्हणून काही मर्यादित काल टिकणारेच असत. त्या आविर्भावांवरून नित्य स्वरू पाच्या अशा त्यांच्या धोरणाची कल्पना बांधणे चुकीचे होते. व ही चूक ज्यांची झाली त्यांच्या हातून टिळकाना परस्पर विरोधी अशी निरनिराळी विशेषणे मिळाली. पण त्यांचे नित्य स्वरूपाचे धोरण काय होते याचा निर्णय नैमित्तिक प्रसंगावरून होण्यासारखा नव्हता तर त्यांच्या एकंदर चारित्र्याचे सामग्रयाने अवलोकन कर- णारालाच देता येईल. व तो निर्णय हाच की टिळकांचे नित्यस्वरूपाचे राजका- रण हे कायदेशीर व सनदशीर असून दांडगाई उद्धटपणा हुल्लड शारिरीक प्रतिकार भाषेचा अत्याचार धाडस धोका सोसण्याची तयारी कायदेभंग बंडखोरी या गोष्टी त्यांच्यासंबंधी नैमित्तिक या सदराखालीच पडतात. टिळक बंडखोर नव्हते अरा- जक नव्हते अत्याचारी नव्हते असे असताहि त्यांचे वर्तन प्रसंगविशेषी इतके बाणेदार तेजस्वी व धडाडीचे असे की त्यामुळे प्रतिपक्षाला व सरकाराला हि ते काय करतील अशाविषयी एक प्रकारची दशहत बसे ! (१) टिळकांचा जाहीरनामा १९१५ साली टिळकानी आपल्या धोरणाचा जो जाहीरनामा काढला त्यात अत्याचारी वर्गाची निंदा किंवा सनदशीर मार्गांनी जाणाऱ्या वर्गाची स्तुति विशेष रीतीने करण्याचा त्यांचा हेतू दिसत नाही. तर सर्वसाधारण रीत्या देशात चळवळीचे धोरण काय असले पाहिजे हे दर्शविण्याचाच दिसतो. सहा वर्षांनी परत येऊन पाहतात तो त्याना १९०८ तली सर्व स्थिति बदलून क्षीणतेची शांतता देशावर टि० पू... ३४