पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ त्यांच्या मनाने घेतले. 'पण प्रवृत्ति धर्म हा चांगला असला तरी तो सांगणारे टिळक कोण ? त्याना काय अधिकार ? या कामी खरा अधिकार पुरातन धर्म ग्रन्थांचा आहे.' व त्यांतून सशास्त्र उपपत्ति काढून दाखविली तरच ती लोकाना पटेल. म्हणून टिळकाना गीतेवर मराठीत भाष्य लिहावे लागले. “हे भाष्य त्यानी केवळ आचार्य म्हणवून घेण्याकरिता लिहिले. लोकमान्यतेच्या बिरुदावळीत ही एक वाण होती ती भरून काढण्याकरिता लिहिले. आपल्या पैलुदार बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करण्याकरिता हे नीतिशास्त्राचे कोंबडे उगाच सजवून मांडले” असे आक्षेप काही लोकानी काढल्याचे वरं सांगितलेच आहे. पण खन्या सहृदय मनुष्याला गीता रहस्याचा हा उगम पटणार नाही. त्याच्या हे तेव्हाच लक्षात येईल की सहा वर्षे काळेपाण्याची शिक्षा भोगणारा मनुष्य बंदिवासात अहंकारबुद्धीने प्रेरित होण्या- पेक्षा, तो आत्मौपम्य बुद्धीने तशाच प्रकारच्या आपत्तीत सापडलेल्या तुरुंगातल्याच काय पण तुरुंगाबाहेरच्याहि आपल्या देशी बान्धवाना मार्गदर्शक असे काही तरी सांगावे या सद्भावनेनेच प्रेरित होण्याचा संभव अधिक उद्या गीतारहस्य ग्रन्थ छापला म्हणजे "केवढा हा ग्रन्थ टिळकानी तुरुंगात लिहिला असे म्हणून आमचे लोक वाहवा करतील" असला क्षुद्र विचारच टिळकांच्या मनात आला असेल काय ? किंवा हिंदुस्थानात एक प्रकारचे रणक्षेत्रच सजून व गजबजून राहिलेले आहे, या रणक्षेत्राच्या अनेक भागात सरकार व प्रजा यांच्यामध्ये विविध प्रकारचे युद्ध सुरू आहे, काल सरकारला अनकूल आहे, विषाद व उदासीनता वाढण्याची सर्व कारणे लोकांच्या बाजूला आहेत, व राजनीतीचे शौर्य किंवा पराक्रम अंगी नसल्या- कारणाने प्रजा या राजकारणाच्या युद्धात पडण्याला कचरण्याचा संभव आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांचे खरे कर्तव्य कोणते व ते कशा बुद्धीने त्यानी करावे हे सांगणे हेच आपले कर्तव्य होय असे टिळकाना वाटले असेल ? या दोहोंपैकी कोणती कल्पना अधिक ग्राह्य हे वाचकांच्या सहृदयतेवरच अवलंबून राहील.