पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ समारोप ७५ विचार असतो. परंतु जीवात्मा धारण करणाऱ्या देही जीवानी प्रत्यक्ष सृष्टीत कसे वागावे याविषयी गमक मिळत नाही. अर्थात् येथेहि कर्तव्याकर्तव्याची विचिकित्सा संभवत नाही. म्हणून नीतिशास्त्ररूप तत्त्वज्ञान आमच्या सनातन धार्मिक वाङ्मया- तून काढावयाचे तर त्याला भगवद्गीतेसारखा दुसरा ग्रंथ मिळणे शक्य नाही. कारण तीत वेदांत हा उपपत्तीदाखल किंवा शास्त्रादाखल येऊन प्रत्यक्ष व्यवहारा- संबंधीच्या नियमांचे दिग्दर्शन कर्मयोगाच्या विवेचनात दिलेले आहे. गीतेत Theory व Pragtice, Science व Art किंवा शास्त्र व व्यवहार यांचा एकत्र विचार अशा रीतीने केलेला सांपडतो की जो नुसत्या वेदांतात सांपडत नाही व नुसत्या स्मृतिग्रंथात हि सापडत नाही. टिळकानी गीतेला जे महत्त्व दिले ते याच कारणाकरिता व गीता म्हणजे नीतिशास्त्र असे जे वर्णन टिळकानी पदोपदी केले आहे त्याचे कारण हेच होय. पण नीतिशास्त्र हा तत्त्वज्ञानाच्या अनेक भागापैकी एक भाग होय. म्हणून सामान्यतः तत्त्वज्ञानाचा विषय गीतेतील नीतिशास्त्र समजून सांगताना आधी मांडणे अवश्य. याकरिता प्रस्तावनेत टिळकानी तो मांडला आहे. पण त्याना हेहि माहित होते की आपल्या इकडील सुशिक्षित लोकांचे मन असे तयार होऊन बसलेले आहे की त्याना तो युरोपियन तत्त्वज्ञानाच्या पद्धतीने किंबहुना परिभाषेने सांगितल्याशिवाय त्यांची समजूत पडणार नाही व समजूत पडली तरी मनाचे समाधान होणार नाही. पाश्चात्य तत्त्वज्ञानाने त्यांच्या मनावर तशी छापच पडलेली आहे व ती काही अंशी सकारणहि आहे. का की तत्त्वज्ञानविषयक संशोधन चिकित्सा व सिद्धान्त ग्रंथाची उत्पत्ति या गोष्टी युरोपात व अमेरिकेत सारख्या वाढत्या प्रमाणावर सुरू आहेत. आणि आमचेकडे खास आमच्या तत्त्व- ज्ञानाचा अभ्यास खुंटलेला असून तो इतका मागे पडलेला आहे की विद्यामंदि - राच्या तळघरातच त्याला हुडकावे लागेल. पण टिळकांचा आत्मविश्वास असा की समजून सांगणारा नीट मांडून दाखविणारा चतुर विचिकित्सक भेटल्यास त्याला गीतेतील नीतिशास्त्र पाश्चात्य नीतिशास्त्राच्या बरोबरीचेच काय पण काही दृष्टीने श्रेष्ठ आहे असे सिद्ध करता येईल ! कार्याकार्यव्यवस्थेच्या विचारप्रसंगी आमच्या लोकानी युरोपियन पंडितांच्या ओंजळीने काय म्हणून पाणी प्यावे ? 'आमचेच पण कळेल तेव्हा' अशी स्थिति असल्यामुळे जे कळेल ते तरी. आपण कळवू अशी उमेद टिळकाना मनातून वाटत होती. म्हणून सवड सापडताच त्यानी ती गोष्ट करून टाकिली. मनुष्य ज्या वृत्तीचा असेल त्या वृत्तीत विशेषतः आपत्तीत व संकटात, त्याला आधार देणे हाच सनातन धर्मीय वाङ्मयाचा व शब्दप्रामाण्यबुद्धीचा एक मोठा उपयोग आहे हे पूर्वी सांगितलेच आहे. आणि टिळकांची वृत्ति उद्योगशील संक- टात न डगमगणारी आपत्तीशी झगडणारी अडचणीतून कुशाग्र बुद्धीने व कार्यकुशलतेने मार्ग काढणारी असल्यामुळे, चालू राजकारणाच्या झगड्यात व एकंदर जीवनकलहात हिंदु लोकाना प्रवृत्तिधर्मच शिकविला पाहिजे असे