पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ O लो० टिळकांचे चरित्र भांग ७ गीतारहस्य प्रसिद्ध होताच त्यावर टीका करण्याकरिता मंडळे निर्माण झाली आणि Extremes meet या न्यायाने या मंडळात पुराणमतवादी लोक व प्राग- तिक प्रोफेसर लोक एकत्र जुळले ! तथापि आपला ग्रंथ शेवटी मान्य व स्थिरपद होईल असा टिळकाना भरवसा होता त्याप्रमाणे त्याची अनेक देशी भाषांतून भाषांतरे झाली व परप्रांतातूनहि त्याला मान्यता मिळाली. असो. गीतारहस्य ग्रंथाचे महत्त्व दुसऱ्या एका दृष्टीने लोक मानतात. मात्र ही दृष्टि इंग्रजी शिकलेल्या लोकांचीच आहे हे नमूद केले पाहिजे, यांच्या दृष्टीने गीतारहस्य ग्रंथातील पूर्वार्धाचे महत्त्व उत्तरार्धापेक्षाहि अधिक आहे.. गीतेच्या लोकांचा शब्दार्थ व त्यावरील टीका किंवा भाष्य यापेक्षा पहिल्या १५- १६ प्रकरणात टिळकानी तुलनात्मक नीतिशास्त्र व गीतेचे अंतरंग व बहिरंग परीक्षण केले आहे ते खरोखर अपूर्व होय. त्यातल्यात्यात महत्त्वाची बाब आमच्या मते ही की पाश्चात्य तत्त्वज्ञान व गीतेतील नीतिशास्त्र यांची सांगड टिळकानी फार चांगली घालून दाखविली. मुंबई युनिव्हर्सिटी स्थापन झाल्यापासून तत्वज्ञान हा विषय इकडील लोकांच्या वाचण्यात थोडथोडा येऊ लागला. अलीकडे त्याचे अध्ययन व अध्यापन वाढले आहे. तथापि मराठी वाङ्मयाकडे पाहिले तर असा एकहि ग्रंथ गीतारहस्यापूर्वीचा दाखविता येणार नाही की ज्यात मराठी वाचकाना युरोपियन तत्त्वज्ञानाचा थोडासा तरी परिचय करून दिलेला आहे. आजहि नाही म्हणावयाला वामन मल्हार' जोशी यांचे एक पुस्तक 'नीतिशास्त्र-प्रवेश' या नावाचे आहे. त्यात तत्त्व- ज्ञानाची मूलभूत काही सूत्रे सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत. पण तत्त्व- ज्ञानमंदिराची पहिली पायरी चढू लागणाऱ्यानाच ते उपयुक्त आहे. इंग्रजी वाङ्म- याच्याद्वारे थोडेबहुत झालेले युरोपियन तत्त्वज्ञानाचे शिक्षण मराठी वाङ्मयातून प्रतिबिंबित होते. पण शास्त्र या दृष्टीने युरोपिअन तत्त्वज्ञानाचा परिचय मराठीतून मिळण्याचे काहीच साधन नव्हते. आमच्या समजुतीप्रमाणे टिळकांच्या गीता- रहस्याचा अभ्यासी विद्यार्थ्यांला मुख्य उपयोग असला तर त्यात सोपी परिचित परिभाषा योजून तुलनात्मक पद्धतीने पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे सार टिळकानी उपलब्ध करून दिले हाच होय. तत्त्वज्ञान या शब्दाचा थोडासा आणखी खुलासा करणे जरूर आहे. आमच्या इकडील वेदांत हेहि तत्त्वज्ञानच होय. परंतु वेदांत शास्त्रात नीतिशास्त्राचा अंतर्भाव नाही. नीतिशास्त्राचा अंतर्भाव आमच्या इकडे ' धर्म शास्त्रात होत असल्या कारणाने आमचे स्मृतिग्रंथ हेच मुख्य नीतिग्रंथ होत... पण स्मृतिग्रंथात विधि नियम परिसंख्या अशा प्रकारानी फक्त आचरणाचे ठराविक नियम सांगितलेले असतात. त्यात कर्तव्याकर्तव्याची विचिकित्सा नसते. स्मृतिग्रंथावरील टीकांचाहि उद्देश ही विचिकित्सा करण्याचा नसून फक्त शब्दार्थ स्पष्ट व सुसंगत करून देण्याचा असतो. दुसरे पक्षी वेदांत शास्त्र घेतले तर. त्यात जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरूप व परस्पर संबंध इतक्यापुरताच मुख्य