पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ समारोप ७३ अशा दृष्टीने पाहिले तर फिटास फीट होऊन अधिक काही टिळकानी केले नाही. क्रियेला प्रतिक्रिया झाली इतकेच काय ते. पण आपला गीता हा धर्मग्रन्थ जर सनातन आहे तर निरनिराळ्या युगाला व प्रत्येक युगातील निरनिराळ्या पिढीला तो सारखाच उपयोगी पडला पाहिजे व तो तसा उपयोगी पडावयाचा तर कालमानाप्रमाणे जी वृत्ति समाजात विशेष प्रबल होईल तिला उपकारी व उपोद्बलक असा अर्थ या सनातन धर्मग्रंथातून काढता आला पाहिजे. शंकराचार्याच्या वेळी किंवा बुद्धकाली संन्यास मार्गाविषयी काय प्रवृत्ति असेल ती असो. पण ती प्रवृत्ति आज या विसाव्या शतकात नाही. यज्ञकर्माच्या अति- रेकामुळे अहिंसेची प्रतिक्रिया, अहिंसेच्या अतिरेकामुळे कुमारील भट्टादि मीमांस- कांची प्रतिक्रिया, फिरून मीमांसक मार्गाच्या अतिरेकामुळे भक्तिमार्गीयांची प्रति- क्रिया, अशा क्रमाने क्रिया व प्रतिक्रिया यांच्या लाटावर लाटा उठलेल्या आपण भारतीय इतिहासात पाहतो. आणि टिळकानी कर्मयोगाचे समर्थन करून उठ- विलेली लाट ही जुन्या सांप्रदायिक भक्तिमार्गाच्या अतिरेकामुळे उठलेल्या प्रति- क्रियेचीच लाट होय. प्रत्येक प्रतिक्रिया ही क्रियेतील अतिरेकाने होणारे समाजाचे अनहित थांबविण्याकरिताच प्रवर्तित झालेली असते. यामुळे कोणत्याहि प्रतिक्रि- येच्या समर्थनात तत्पूर्वीच्या मार्गाची थोडीबहुत प्रगट किंवा प्रच्छन्न निंदा किंवा दूषण देण्याची बुद्धि ही असावयाचीच. कोणत्याहि सुधारणेचे पहिले कार्य दिस- ण्यात विध्वंसक व निंदेच्या कर्तव्यामुळे अप्रिय असेच असते. पण तेवढा अप- रिहार्य दोष वजा घातला असता प्रतिक्रिया होते ती चांगल्या करिताच होते म्हणून तिचे समाजाकडून शेवटी स्वागतच झालेले आढळते. पण कोणत्याहि हिंदी धार्मिक प्रतिक्रियेत हीच मौज आहे की तिला सनातन धर्मग्रंथांच्या पायावर उभे राहता येऊ शकते. आणि ज्या आधारावर संन्यासमार्गाची त्या काली तो योग्य म्हणून प्रतिष्ठा झाली त्या आधारावर वर्तमानकाली कर्मोपदेश हा योग्य म्हणून त्याचीहि प्रतिष्ठा सहजच होणार. हल्लीचा काल प्रवृत्तिपर आहे निवृत्तिपर नाही. ज्ञानोत्तर कर्म न करणे हे सर्वोत्तम मानले तरी ज्ञान्याला कर्म करण्यासाठी जी शास्त्रानी ऐच्छिक सवड ठेवली आहे तिचा उपयोग करून सर्व ज्ञानी मनुष्यानी पुढे येऊन समाजसेवेला सादर झाले पाहिजे असाच काल आता आला आहे. अशा स्थितीत 'गीतारहस्या'वर प्रथम प्रथम अनेक आक्षेप आले तरी एकंदरीने लोकाना उत्तेजन देणारा कर्मप्रवण करणारा उद्योगी बनविणारा नशिबाला दोष देऊन कपाळाला हात लावून स्वस्थ बसणारांचा निषेध करणारा जशास तसे वागणे ही नीति आहे असे सांगून धीर देणारा असाच आजहि गीतारहस्य ग्रन्थ नवीन पिढीला वाटेल याविषयी दुमत नाही. व तसे फल या अन्धापासून मिळाले तर कोणत्या शब्दाची टिळकानी किती ओढाताण केली याकडे कोणी लक्ष देईल असे आम्हास वाटत नाही. त्यांची चूक असली तरी ती शास्त्रीय चूक असेल. पण त्या चुकीपासूनहि समाजाचे हितच होईल याविषयी कोणास शंका वाटत नाही.