पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ लो० टिळकांचे चरित्र भाग १ तऱ्हेचे किळसवाणे लेख ना. गोखले यास स्वतः पसंत असतील की नाही किंवा त्यांच्या हल्लीच्या अस्वास्थ्यतेत या प्रकारच्या लेखाना त्यानी मंजुरी तरी दिली असेल की नाही याची शंकाच आहे. पण शिष्यापराधे गुरोर्दंड: ' या न्यायाने साकरिता ना. गोपाळराव गोखले यासहि त्यांचे प्रायश्चितं भोगावे लागल्यास त्यात काही नवल नाही. आमच्या मते या वादाचा जितका जास्त खल होईल तितके अधिक काळेच बाहेर पडेल. पण तसे असले तरी या वादात खरे काय ? हे लोकास कळविणे आता जरूर असल्यामुळे या विषयावर नाइलाजास्तव पुनः अग्रलेख लिहिण्याचे आज आम्ही योजिले आहे आणि हे प्रवाहपतित कर्तव्य करीत असता त्यात कोणास दुखवावे लागल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर येत नाही एवढेच आमचे पहिले सांगणे आहे. समेटाचा पूर्वरंग आता प्रथम समेट कसा मोडला याची थोडी खरी हकीकत सांगतों. समे- टाचे बोलणे यंदा प्रथम राष्ट्रीय पक्षाच्या बाजूने नव्हे तर विझांटबाईच्या उद्यो- गाने सुरू झालेले आहे. या बाई समेटाचे बोलणे करण्याकरिता पुण्यास येणार असे रा. टिळक यास त्यानी लिहिल्यावर रा. टिळक यानी पत्त्रद्वारे ठिकठिकाणच्या पुढारी राष्ट्रीय लोकांचा सल्ला घेतला व काहीस पुण्यासहि बोलावून घेतले अशा- करिता की विझांटवाईस सर्वोच्या एकमताने काही तरी निश्चित जबाब देता यावा व त्याप्रमाणे सर्वांचे एकमत होऊन समेट कोणत्या शर्तीवर व्हावा तेहि विझांट- बाई पुण्यास येण्यापूर्वीच ठरविण्यात आले होते. मवाळांच्या कंपूत राजाचा हुकुम ज्याप्रमाणे सर्व सर्वेट्स शिरसा मान्य करितात तशी राष्ट्रीय पक्षाची स्थिति नसून राष्ट्रीय पक्षात कोणताहि निर्णय सर्वोच्या विचारानेच करावा लागतो ही गोष्ट ज्यास माहीत असेल त्याला रा. टिळकानी स्वीकारलेल्या मार्गाचे किंचितहि आश्चर्य वाटणार नाही. असो याप्रमाणे विझांटबाईस काय सांगावयाचे ते निश्चित झाल्यावर पुढे काही अनिवार्य कारणामुळे मिसेस बिझांटबाई उशीराने म्हणजे २९ नवेंबर रोजी पुण्यास यावयाच्या होत्या त्या ७ डिसेंबर रोजी पुण्यास आल्या व त्या वेळी मंडळीचे काय मत होते ते छापून त्यास देण्यात आले व तेच पुढे मराठा पत्रात प्रसिद्ध केले आहे. मद्रासच्या काँग्रेसपुढे कॉन्स्टिटयूशनची दुरुस्ती करण्यासाठी बाई जो ठराव आणणार होत्या त्याचा मसुदा ना. गोखले यानी तयार केला होता असे आता प्रसिद्ध झाले आहे तेव्हा ना. गोखले हे या दुरुस्तीस एवढा वेळपर्यंत अनुकूल होते असे म्हणण्यास हरकत नाही. रा. टिळकानी त्या- बद्दल आपली अनुमति पूर्वीच प्रसिद्ध केली होती आणि बंगाल्यातील राष्ट्रीय पक्षहि त्याला कबूल होता. सारांश काँग्रेस सभेचे अध्यक्ष भूपेंद्रनाथ बाबू अमृत- झार पत्रिकेचे संपादक मोतिलाल बाबू यास मुद्दाम बरोबर घेऊन कलकत्त्याहून निघेपर्यंत जिकडे तिकडे सर्व यथास्थित असून यंदा समेट होणार, असे सर्वास