पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ समारोप चीहि तीच कसोटी बनते. गीतेत हे सर्व विचार आलेले आहेत व शेवटी " धुवा नीतिर्मतिर्मम' यातच नव्हे तर 'किं कर्म किमकर्मेति' इ० श्लोकातहि भगवंतानी नीतीचे तत्त्व सुचविले आहे. कार्याकार्यव्यवस्थितीसाठी शास्त्र प्रमाण मानावे असे 'नुसते गीतेत म्हटले नाही तर ' तस्मात् ' हा शब्द मागे असल्यामुळे शास्त्राला हे प्रामाण्य का आले याचेहि विवेचन गीताकारास इष्ट होते असे दिसून येते. पूर्वीचे शास्त्री नीति हा स्वतंत्र विषय मानीत नसल्यामुळे गीतेवरील पूर्वटीकातून या विषयाला विशेष महत्त्व दिलेले नाही हे खरे. पण पूर्वीच्या शास्त्र्यापेक्षा आमची दृष्टि तुलनात्मक शास्त्रीय अभ्यासाने जर अधिक व्यापक बनलेली आहे तर गीते - तील निष्काम कर्मयोग हे एक नीतिशास्त्राचेच आध्यात्मिक रूपांतर आहे ही गोष्ट स्पष्टपणे सांगण्यास आम्ही कचरलो म्हणजे आपल्या कर्तव्यास विसरणे होय. येथे केवळ गुरुपरंपरेवर राहून चालावयाचे नाही आणि चालूहि नये. इंग्रजी तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचलेल्या कोल्हटकरास ही गोष्ट थोड्या विचाराअंती सहज कळली असती. पण अंध गुरुपरंपरेच्या भपक्यावर एखाद्या विशिष्ट व्यक्तीची निंदा करण्यासाठीच जो ग्रंथ लिहिला लिहविला व प्रसिद्ध झाला त्या ग्रंथात असले विचार कोठून येणार?” (१०) समारोप शेवटी गीतारहस्यावरील टीकेचा हा विषय सोडून देऊन सामान्यपणे दोन शब्द लिहून हे प्रकरण पुरे करू, गीतारहस्यावर कोणीहि कितीहि प्रतिकूल टीका केली तरी त्यात दिसून येणाऱ्या टिळकांच्या विद्वत्तेविषयी व धार्मिक वाङ्मयातील त्यांच्या प्राविण्याविषयी कोणीहि शंका घेऊ शकला नाही. प्रतिपक्षी यानीहि प्रति- • कूल टीका करण्याच्या आधी हा ग्रन्थ अपूर्व आहे आपल्यापरीने उत्तम आहे असेच उद्गार काढले आहेत. पूर्वीचे त्यांचे दोन इंग्रजी ग्रन्थ ज्यानी वाचले आहेत त्याना टिळकांच्या पांडित्यासंबंधाने शंकाच उरली नव्हती. इतकेच नव्हे तर अभ्यास केला असता बुद्धिमत्तेच्या जोरावर ते कोणत्याहि शास्त्रात ग्रन्थ लिहू शकतील अशीहि कबुली नवीन पद्धतीच्या सुशिक्षित लोकानी दिली असती. पण टिळकानी गीतेवर मराठीत भाष्य लिहिले ही गोष्ट जुन्या परंपरेच्या लोकाना मना- पासून फारशी आवडली नाही. किंबहुना बुद्धिमत्तेच्या बळावर टिळकानी एकप्र- कारे मर्यादा सोडली, दुसन्याच्या राखीव क्षेत्रात पाय टाकला, अतिक्रमण केले, टिळ- कांच्या अहंमन्यतेला ही वाचा फुटली, महत्त्वाकांक्षेचा कळस झाला, व लोकप्रिय- तिचा दुरुपयोग झाला असेहि कित्येकाना वाटले. याची कारणे दोन. एक शंकरा- चार्याच्या भाष्याशी व तात्पर्याशी त्यांचा विरोध, व दुसरे जुने सांप्रदायिक भक्ति- मार्गी लोक संन्यासी वगैरेसंबंधाने त्यांच्या लिहिण्यात कोठे कोठे आलेले अनादर दर्शक शब्द. पैकी या दुसन्या आक्षेपासंबंधाने पाहिले तर टिळकांचे टीकाकाराना जे उत्तर वर छापले आहे त्यात या आक्षेपाला उत्तर आलेच आहे. शिवाय