पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० लो० टिळकांचे चरित्र भाग ७ तद्वारा मोक्ष प्राप्त करून येता येतो याचे भगवंतानी गीतेत विवेचन केलेले आहे. स्मृतिग्रंथात चातुर्वर्ण्यविभागाचे नुसते वर्णन असून मोक्ष पाहिजे असल्यास संन्यास घ्या असे स्मृतिकार सांगतात. गीता तसे सांगत नाही. आश्रमसंन्यास गीतेत कोठेहि वर्णिला नाही. गीतेचा संन्यास म्हणजे फलसंन्यास होय. हा आश्रम- संन्यासाहून भिन्न आहे. किंबहुना याचमुळे स्मार्त आणि भागवत हे संप्रदाय भिन्न झालेले आहेत असे गीतारहस्यात स्पष्ट म्हटलेले आहे. पण कोल्हटकरांची दृष्टि तिकडे जाते कशाला ? मनुस्मृतीत वर्णिलेल्या संन्यासाश्रमाची व गीतेतील फलत्यागरूपी संन्यासाची तुलना करण्याचे परिश्रम त्यानी घेतले आहेत असे दिसत नाही; आणि ते परिश्रम तरी त्यानी का घ्यावे ? सर्व भिस्त जेथे गुरुपरंपरे- वर तेथे स्वतः एवढी खटपट करण्याचे कारण काय ? खाटिकाला निष्काम कर्मयोग कसा सिद्ध होणार ? अशी त्यास शंका आली आहे; आणि ग्रंथाच्या आरंभी एका शेतकऱ्याचा संवाद देऊन त्यानी निष्कामकर्माची टर उडविण्याचा प्रयत्न केला आहे. पण कोल्हटकराना असे कळेना की, ही टर किंवा निंदा टिळकांची होत नसून भगवंतांची होते; कारण गीतेत निष्कामकर्मयोग सांगितला आहे ही गोष्ट त्यासहि मान्य आहे. मग निष्कामकर्माची थट्टा कशाला ? सर्वच स्थितप्रज्ञ होणे शक्य नाही हे गीतेस माहीत नव्हते असे नाही. 'मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये' हा सिद्धांत गीतेतच सांगितला आहे. स्थितप्रज्ञ थोडेच असणार. पण या स्थितप्रज्ञाखेरीज इतर लोकांच्या डोळ्यापुढे चातुर्वर्ण्य विहित कर्मे करताना जे ध्येय मांडावयाचे ते स्थितप्रज्ञाच्या समबुद्धीचेच असले पाहिजे असा गीतेचा सिद्धांत आहे; आणि कोल्हटकरांच्या शेतकऱ्यास जरी द्वा सिद्धांत न समजला - किंबहुना कोल्हटकरासहि न समजला तरीहि गीतेत अनु- करणी म्हणून लोकांपुढे मांडलेल्या या ध्येयास यत्किंचितहि कमीपणा येत नाही. नीतीची उपपत्ति "सरतेशेवटी रामदुर्गचे कारभारी असे म्हणतात की नीतीची उपपत्ति ब्रह्म- ज्ञानाने लागत नसून किंवा गीतेत लावलेली नसून ही उपपत्ति लावण्यास पुन- जन्मवादाचाच स्वीकार केला पाहिजे. परंतु त्याबद्दल गुरुपरंपरेचा साक्षात् आधार कोल्हटकरांनी काहीएक दिला नाही. जसे करावे तसे भोगावे चांगले केले चांगले भोगावे वाईट केले वाईट भोगावे हा पुनर्जन्माचा सिद्धात. चांगले कोणते आणि वाईट कोणते याचा विचार पुनर्जन्मवाद करीत नाही. तो नीतीचा प्रश्न आहे आणि त्याचा विचार मोक्षशास्त्रदृष्ट्याच करावा लागतो कारण मोक्ष ही सर्वात चांगली व अत्यंत हिताची गोष्ट होय आणि ती सिद्ध होण्यास कर्म करणे तेहि अत्यंत चांगले करावे लागते म्हणून मोक्षप्रद कर्मयोगशास्त्रात कर्माचे बंधन घाल- विण्यास निष्कामता किंवा समत्वबुद्धि हाच एक उपाय असे प्रतिपादन करीत असतात आणि मोक्षशास्त्रदृष्ट्या हा उपाय सिद्ध झाल्यावर कर्माच्या चांगुलपणा-