पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ टीकाकाराना टिळकांचे उत्तर ६९ शास्त्र सांगितले हे खरे. पण अर्जुन अज्ञानी म्हणून तितक्या पुरतेच त्याला सांगि- तले आम्ही ज्ञानी अतएव कर्मसंन्यासच केला पाहिजे या कोट्या सर्वथैव पोकळ अभिमानाच्या अतएव अग्राह्य होत. अशा कोट्या करण्यापेक्षा गीतेचा पंथ निराळा आमचा निराळा. गीताशास्त्र प्रमाण खरे पण आमची अभिरुचि निराळी असे प्रतिपादन करणे अधिक सरळपणाचे आणि प्रामाणिकपणाचे होईल. आपली अभिरुचि भिन्न म्हणून बलात्काराने गीतेसहि संन्यास देणे युक्त नाही. कित्येक म्हणतात युद्धाचा प्रसंग होता म्हणून कर्मयोग सांगितला पण हि योग्य नाही. कोणतेहि शास्त्र का होईना ते प्रसंगानेच सांगितले जाते हे खरे पण प्रसंगाला प्रसंगापुरतेच उत्तर देऊन काम भागविणे म्हणजे एकप्रकारे श्रोत्यास फसविणे होय. भगवानानी असे केले नाही व त्यांची तशी इच्छाहि नव्हती. संन्यास व कर्मयोग अशा ज्या जगात चालत आलेल्या दोन निष्ठा त्यापैकी कर्मयोगनिष्ठा लोकसंग्रहदृष्ट्या अधिक श्रेयस्कर हे शास्त्रोक्त रीतीने भगवंतानी प्रतिपादन केले आहे; आणि प्रसंग जरी युद्धाचा असला तरी या शास्त्रोक्त प्रतिपादनास त्यामुळे काही वैगुण्य किंवा कमीपणा येत नाही. प्रसंगाने जरी बोलावयाचे असले तरी भगवान नेहमीच खरे बोलतात हे लक्षात ठेवले पाहिजे. वर्णाश्रमधर्म " गीतेत कर्मयोग प्रतिपाद्य नसून वर्णाश्रमधर्म प्रतिपाद्य आहे असे कोल्हट- कर म्हणतात आणि त्यास 'श्रेयान्स्वधर्मः ' इ० वचनांचा आधार देतात. पण आमचा त्यास एवढाच प्रश्न आहे की, नुसता वर्णाश्रमधर्मच जर भगवंतास गीतेत सांगावयाचा होता तर ज्ञान सांगण्याचा एवढा खटाटोप कशाला ? क्षत्रिय आहेस म्हणून युद्ध कर, एवढे म्हटले म्हणजे संपले भिक्षा ब्राह्मण मागतात, तूं मांगू नको. इत्यादि कोट्या टीकाकारानी लढवलेल्या आहेत, भगवंतांच्या नव्हत. प्रत्येकाची कर्मे चातुर्वर्ण्यव्यवस्थेप्रमाणे विभागलेली आहेत, किंबहुना भगवंतानीच गुणकर्मानुरूप ती निर्माण केली आहेत, ही गोष्ट गीतेस मान्य आहे. पण ही चातुर्वर्ण्यव्यवस्था पाळ किंवा स्नानसंध्यादि अगर यज्ञयागादि कर्मे कर, हे सांगण्याचा गीतेचा मुख्य हेतु नव्हे. ही कर्मे आजन्म करीत असताहि मोक्ष कसा मिळेल हा गीतेतला प्रश्न आहे. पूर्वशास्त्रे पाहू गेले असता यज्ञयागादिकानी मोक्ष मिळतो असे एक शास्त्र, तर कर्मसंन्यास केल्याखेरीज मोक्ष मिळत नाही असे दुसरे शास्त्र; आणि यज्ञयाग किंवा संन्यास ब्राह्मणासच विहित. मग सगळ्या वर्णातील लोकास मोक्ष कसा मिळणार ? त्यानी आपली कर्मे सोडून संन्यास घ्यावा काय १ आणि सर्वांनी आपली स्ववर्णविहित कर्मे सोडली तर जग तरी कसे चालणार ? उपनिषदात अगर पूर्वमीमांसेत या गोष्टीचा मुळीच विचार केलेला नाही, निदान उपेक्षा तरी केलेली आहे हे निश्चित होय. तेव्हा हा दोष दूर करून सर्व वर्णातील लोकाना आपापली कर्मे करीत असताच कोणत्या युक्तीने