पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ त्यांच्याहि लक्षात आलेली नाही; आणि ब्रह्मसूत्रासच नव्हे तर त्यांचे गुरु जे आचार्य त्यांच्या भाष्यास आणि योगवासिष्ठादि प्रतिष्ठित वेदांतग्रंथास किंबहुना सर्व वेदांतशास्त्रासह विरुद्ध असा अपसिद्धांत त्यांनी आपल्या कर्मविपाकयोगप्रकर- णात ठासून प्रतिपादिला आहे ! गुरुपरंपरा व सांप्रदाय यांच्याबद्दल त्यांचे किती अज्ञान आहे हे या एकाच गोष्टीवरून स्पष्ट होईल. अर्जुन ज्ञानी का अज्ञानी ? "कोल्हटकरांनीच नव्हे तर दुसऱ्याहि टीकाकारानी अर्जुन ज्ञानी का अज्ञानी असा एक प्रश्न उपस्थित करून अर्जुन अज्ञानी होता म्हणून त्याला कर्मयोग उप- देशिला अशा कोट्या केल्या आहेत. पण आमच्या मते हा विचार सर्वथैव असं- बद्ध व अप्रयोजक आहे. गीता हे एक शास्त्र आहे आणि स्वधर्माप्रमाणे आचरण करूनहि मनुष्य कृतकृत्य कसा होतो याचे त्यात थोडक्यात पण सांगोपांग व पूर्ण विवेचन आहे. गीता ही काही विशिष्ट प्रसंगाला उद्देशून 'ताकापुरते रामायण सांगितलेली नव्हे. एतद्बुध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ' - हे समजून घेत- ल्याने मनुष्य कृतकृत्य होतो असे भगवंतानी गीतेत स्वच्छ म्हटले आहे. भाग- वतात उद्धवास निराळ्या प्रकारचा उपदेश केला असल्यामुळे गीतेतील उपदेश अपुरा मानला पाहिजे अशी रा. बाबा गर्दे यानी एक शंका काढली होती. पण तीहि बरोबर नाही. कारण दोनहि ठिकाणी भगवंताचे जरी नाव असले तरी गीतेनंतर कित्येक शतकानी झालेल्या भागवताची व गीतेची एकवाक्यता करणे इष्ट नाही असे गीतारहस्यातच आम्ही दाखविले आहे. कोल्हटकर म्हणतात की ही ऐतिहासिक पद्धत धर्मविषयक चर्चेत कामाची नाही. पण हीहि चूक होय आणि या चुकीच्या समजामुळेच धर्मविषयक चर्चेत अनेक घोटाळे उत्पन्न होऊन एकवाक्यता म्हणजे भात, भाजी व आमटी वगैरे सर्व जिन्नस कुटून एकरस बनविणे असा भ्रम उत्पन्न झालेला आहे. एकवाक्यता करणे ती अशा प्रकारे न करता कधी कालभेदाने तर कधी विकल्प कल्पूनहि करावी लागते हे तत्त्व पूर्वीच्या मीमांसकासहि मान्य झालेले आहे, आणि तेच इल्लीचे मीमांसकहि प्रमाण धरून चालतात. किंबहुना कोणत्याही विषयाची ऐतिहासिक पद्धत म्हणजेच काल- भेदाने व रुचिभेदाने व्यवस्था लावणे होय; आणि हीच पद्धत आम्ही गीतेसहि लावू इच्छितो. धर्माची मुख्य तत्त्वे व प्रमाणग्रंथ एक असताहि त्यात निरानेराळे संप्रदाय निघण्याचे हेच कारण होय. अशा दृष्टीने विचार केला म्हणजे गीता हे कर्मयोगपर स्वतंत्र, सुगम व पूर्ण शास्त्र आहे असे मानणे भाग पडते; आणि असे मानले म्हणजे अर्जुन अज्ञानी का ज्ञानी या प्रश्नाचे काहीच महत्त्व राहत नाही. शाळेतील वर्गामध्ये भूमिति-शास्त्र शिकवीत असता अमुक विद्यार्थी चलाख आणि •अमुक मंद इ. गोष्टींचा जसा गुरु विचार करीत नाही, सर्व शास्त्र सर्वास नीट - समजावून देतो, तद्वतच गीतेची गोष्ट आहे. अर्जुनाला मोह झाला म्हणून गीता-