पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 • भाग ७ टीकाकाराना टिळकांचे उत्तर प्रयत्नवाद व दैववाद ६७ 'कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य' असे जे गीतारहस्यात प्रकरण आहे त्यावर कोल्हटकरानी जी टीका केली आहे ती चुकीचीच नव्हे, तर खच्या वेदांत सिद्धांताच्या विरुद्ध आहे. आत्मस्वातंत्र्य आणि आत्मकर्तृत्व या शब्दांचा भेदच त्यास कळला नाही. वेदांत शास्त्राप्रमाणे आत्मा अकर्ता आहे हे गीतारहस्यातहि स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्याचप्रमाणे सर्व कर्तृत्व जड प्रकृतीचे, हा सिद्धांतहि रहस्यात दिलेला आहे. पण वेदांत शास्त्राप्रमाणे पाहिले तर प्रकृतीच्या ठायी है जे कर्तृत्व येत असते ते परमेश्वराच्या (किंवा आत्म्याच्या ) अध्यक्षतेखाली येत असते ( गीता ९. १०). नुसती प्रकृतीच घेतली तर ती आंधळी होय. तेव्हा आता असा प्रश्न उपस्थित होतो की, आत्मा देहात बद्ध झाल्यावर देहाकडून जी मोक्षानुकूल कर्मे होतात ती देहाचे धर्म म्हणून होतात किंवा आत्म्याकडून देह- प्रकृतीला तशी प्रेरणा होते १ देहाकडूनच होतात म्हटले तर सर्वांस मोक्ष मिळाला पाहिजे. शिवाय प्रकृतीला स्वतंत्र कर्तृत्वहि नाही; म्हणून अशा स्थळी म्हणजे आत्मा देहात बद्ध झाल्यावर प्रकृतीकडून मोक्षानुकूल कर्म करविण्यास तो समर्थ आहे असा सर्व वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे व हाच सिद्धांत जीवकर्तृत्वाधि- करणात व गीतारहस्यात स्वीकारलेला आहे. किंबहुना हा सिद्धांत स्वीकारल्या- खेरीज मोक्ष मिळणेच अशक्य होय. मोक्ष मिळविणे हा प्रकृतीचा धर्म नव्हे, आत्म्याच्या स्वातंत्र्यामुळे त्याच्या भोवतालच्या प्रकृतीत तो ही प्रेरणा करीत असतो. याचे नाव प्रयत्न आणि हा प्रयत्न मनुष्याने एकसारखा केला पाहिजे, प्रकृति हट्टी असली तरी हळुहळु तिचे दमन करता येते, हे सिद्धांतच " प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्विषः । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् " किंवा ' यतते च ततो भूयः' इत्यादि गीता श्लोकात सांगितले आहेत. गीता प्रयत्नवादी नाही हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे होय. योगवासिष्ठकारानी हाच सिद्धांत मुमुक्षु -व्यवहार- प्रकरणात दिला असून तेथे “ मूर्ख मनुष्याना दैव म्हणून काही आहे असा भ्रम होतो " आणि " प्राक्तन कर्माने आपली सध्याची स्थिति नियमित झाली असली तरी आपल्याला मुळीच स्वातंत्र्य नाही अशी तुझी जी भावना झाली आहे ती बरोबर नाही," असे वसिष्ठानी रामास सांगितले आहे, ( योगवासिष्ठ मराठी भाषांतर पान ८३ व ८६ ). योगवासिष्ठाचे आता सुलभ मराठीत भाषांतर झाले असल्यामुळे तेच मी आपल्यास वाचून दाखविले. कोल्हटकर यानी या बाबतीत सर्व भिस्त हेकेलवर ठेवली आहे. पण हेकेल अनात्मवादी आहे आणि वेदांत आत्मवादी आहे; आणि अनात्मवाद्यांचा सिद्धांत आत्म- वाद्याला सर्वस्वी स्वीकारता येत नाही हे रहस्यावर टीका करण्याच्या भरात कोल्हट- करांच्या लक्षात राहिले नाहीसे दिसते. जीवकर्तृत्व अधिकरण आत्म्याबद्दल नाही जीवाबद्दल आहे असे ते मोठ्या डौलाने सांगत आहेत. पण या अधिकरणात कर्तृत्व या शब्दानेच स्वातंत्र्याचा बोध होतो ही गोष्ट पुष्कळ शास्त्री लोकाप्रमाणे