पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ असे तरी आम्ही समजू. फार काय सांगावे कोल्हटकरांचे गुरु शंकराचार्यदेखील • लोकसंग्रहार्थ ज्ञानी पुरुषाने कर्म केल्यास चालेल असे म्हणतात. गीतेचा आणि त्यांचा भेद काय तो एवढाच की गीतेचा ओढा निष्कामकर्माकडे आणि आचा- र्यांचा ओढा कर्मसंन्यासाकडे आहे. कोल्हटकरास ही गोष्ट कळली नाही अगर कळत नाही असे नाही. पण वादाच्या या मुख्य मुद्दयाचा याप्रमाणे निर्णय होतो असे कबूल केल्यावर टिळकांची निंदा करावयास कसे सांपडणार ? आता कदा- चित् कोणी असे म्हणतील की स्थितप्रज्ञांनी अशा रीतीने आपणास बांधून घेणे ज्या अर्थी त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे त्या अर्थी कदाचित् ते आपणास हा . निर्बंध लागू करून घेणार नाहीत. होय; पण त्यानी असे करणे लोकसंग्रहदृष्टया गीता (टिळक नव्हे) प्रशस्त मानीत नाही आणि हाच काय तो गीता आणि संन्यासमार्ग यातील भेद आहे. ' कर्म ज्यायोह्यकर्मणः कर्मयोगो विशिष्यते यातील बीज हेंच होय. हे अर्थवाद नसून गीतेचे सिद्धांत आहेत. वेदविरोध , "आचार्यांचा कर्मसंन्यासाकडे जो ओढा आहे तो उपनिषदांच्या आधारे •असल्यामुळे या उपनिषदाना अनुकूल असा गीतेचा अर्थ त्यानी केला आहे. पण त्यामुळे गीतेचा कर्मयोगपर अर्थ लावणे वेदविरुद्ध आहे असे जे कोल्हटकरप्रभृति * प्रतिपादन करतात ते मात्र खरे म्हणता येत नाही. शंकराचार्यानी उपनिषदाचे जे अर्थ केले तेच सरळ व खरे असून तद्विरुद्ध कोणताहि अर्थ करता येत नाही असे ज्यांचे मत असेल त्याना गीतेचा कर्मयोगपर अर्थ लावणे अप्रशस्त वाटेल नाही असे नाही. पण वेदांचा सर्वजण एकच अर्थ करतात असे नाही. रामा- नुजाचार्यादिकानी याच वचनांचे निराळे अर्थ केलेले आहेत आणि त्यापैकी सरळ कोणता आणि सांप्रदायिक कोणता हे ठरविण्याची साधने आज आपल्यास उप- लब्ध आहेत. या साधनांचा उपयोग करून उपनिषदांचे अर्थ लावल्यास त्यात 'संन्यासमार्गाबरोबरच कर्मयोगमार्गहि विकल्पाने प्रतिपादिला आहे. असे गीतारह- `स्यात स्पष्ट दाखविले आहे. गुरुपरंपरेने अंध झालेल्या दृष्टीस ते दिसत नसल्यास आमचा इलाज नाही. आमचे एवढेच म्हणणे आहे की संन्यास जितका श्रुति- स्मृतिप्रतिपादित तितकाच कर्मयोगहि श्रुतिस्मृतिप्रतिपादित आहे. रद्दस्यकार श्रुति- : स्मृति प्रमाण मानीत नाहीत वगैरे जी कुत्सित विधाने कोल्हटकरानी केली आहेत ती सर्व निर्मूल होत. अशी निर्मूल विधाने करण्यात त्यांचा काय हेतु असावा हे . त्यांचे त्यासच माहीत. अथवा गीतारहस्य लिहिण्याचे प्रयोजनच ज्यास कळले "नाही व कळत नाही त्याच्या हातून सदर ग्रंथावर अशा प्रकारची विपर्यस्त टीका झाली असल्यास त्यात नवल तरी कसले ?