पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ टीकाकाराना टिळकांचे उत्तर ६५ रीतीने प्रतिपादिला आहे, (गी. र. पा. ३७०). अर्थात् रहस्यकारास तो संमत आहे हे सांगावयास नको. रहस्यावरील टीकाकारास जी गोष्ट कळत नाही ती निराळीच आहे. कायद्यात असे सांगत असतात की (आणि हे निदान कोल्हट- करास तरी माहीत असले पाहिजे) राजाने केलेल्या कायद्याने प्रजा जरी बांधली गेली तरी राजा बांधला जात नाही पण त्यावरून असे होत नाही की राजाने आपण होऊन प्रजेच्या कल्याणार्थ आपल्यावर काही निर्बंध घालून घेऊ नयेत. उदाहरणार्थ वाटेल त्या मनुष्यास वाटेल ती शिक्षा करण्याचा राजास अधिकार आहे. पण तो तसे करू शकत नाही; काही विशिष्ट कारणाकरिताच त्यास शिक्षा करावी लागते ही गोष्ट सर्वसंमत आहे. स्थितप्रज्ञासहि हाच न्याय लागू आहे. ' तेषां याः स्वैरकथास्ता एव भवंति शास्त्राणि 'त्याचे जे वर्तन तेच विधिनिषेध- रूपी शास्त्र होय हे खरे. पण लोकांच्या हुकुमाने नव्हे तर विधिनिषेधाचे जनक या नात्यानेच सदर विधिनिषेध लोकसंग्रहार्थ त्यास पाळावे लागत असतात; आणि हाच अर्थ ' यद्यदाचरति श्रेष्ठः ' या गीतावचनात स्पष्ट केलेला आहे. विधिनिषेध घालणारे गृहस्थ जर त्याप्रमाणे वागणार नाहीत तर दुसरे लोक तरी कसे वागणार ? यासाठी स्थितप्रज्ञानी आपण होऊनच टिळकांच्या सांगण्यावरून नव्दे-विधिनिषेधाची बंधने आपणास लावून घेतलेली असतात. किंबहुना ही बंधने पाळूनच जनकादिकासारख्या ज्ञानी पुरुषानी लोकसंग्रह केलेला आहे, आणि त्यांच्या या कर्मापासून जगाचे कल्याणहि झालेले आहे असे कोल्ह- टकर यानीच आपल्या ग्रंथात ( पृ० १३०) कबूल केले आहे. मग वाद राहिला कोठे ? तुम्ही कर्मे करा असे ज्ञान्यास अज्ञानी लोक सांगत नाहीत ज्ञानीच सांगतात, एवढे लक्षात ठेवले म्हणजे वाद मिटला. मग टिळकाना शिव्या द्यावयाच्या असल्यास त्या दुसऱ्या कोठे तरी देता येतील. त्याला हेच निमित्त पाहिजे असे नाही. स्थितप्रज्ञ जगासच विधि लावतात असे नव्हे, तर लोकसंग्रहार्थ - लोकैषणेने नव्हे तोच विधि आपणहि पाळतात हेच तत्त्व “ कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तः " जोषयेत्सर्वकर्माणि " " जिजीविषेत्शतं समाः " इ० वाक्यात कुर्यात् (करावे) जोषयेत् ( करवावे) जिजीविषेत् ( जिवंत राह- ण्याची इच्छा धरावी) इ० विध्यर्थक प्रयोगानी प्रतिपादिले आहे. 'कुर्यात् ' वगैरे शब्द विधीचे दर्शक होत असा मीमांसकांचा स्पष्ट न्याय आहे; व तीच पदे जर वरील श्लोकात आहेत तर उडवाउडवीने ती कशी तरी अर्थवादात्मक सम- जून गीतेचा विपरीत अर्थ करणे अगदी गैरशिस्त होय असे आमचे मत आहे. तुम्ही काही बडबड करा सर्व ज्ञान्यामध्ये श्रेष्ठ जे भगवान् ते आपल्या प्रिय भक्तास म्ह० ज्ञान्यास लोकसंग्रहार्थ कर्मे करावी असे स्पष्ट सांगत आहेत. इतक्या- उपरहि भगवंतास असे सांगण्याचा काय अधिकार ? अशा बाष्कळ कोट्या करून गीतेचा उपमर्द करणें आमच्या मते अत्यंत अनुचित व साहसाचे होय. यापेक्षा गीता मला मान्य नाही असे जर कोणी म्हणेल तर निदान तो प्रामाणिक आहे