पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ नंतर कर्मे होत नाहीत वगैरे ज्या तार्किक कोट्या हे टीकाकार लढवतात त्यांची वाट काय ? जनकाचे उदाहरण घ्या शंकराचार्यांचे घ्या ज्ञानेश्वराचे घ्या वसि- ष्ठाचे घ्या किंवा श्रीकृष्णाचे घ्या. पूर्ण स्थितप्रज्ञ असूनहि जर यानी कर्मे केली तर जे या स्थितीस पोचले नाहीत अशा लोकानी वासनाक्षयानंतर कर्म अशक्य आहे अशा जरी हजारो कोट्या केल्या तरी त्या सर्व व्यर्थ व तर्कटीपणाच्या होत. कारण त्या सर्व स्थितप्रज्ञांच्या प्रत्यक्ष कृतीशी पूर्ण विसंगत आहेत. कोल्हटकरानी ' विहाय कामान्यः सर्वान्' हा गीतेतला श्लोक मोठ्या डौलाने पुढे आणला आहे. पण या श्लोकातच पुढे चरति = वागतो असे जे पद आहे त्याचा त्यानी मुळीच विचार केला नाही. सारांश ज्या लोकांच्या सर्व वासना म्हणजे काम्यवासना नष्ट झाल्या ज्याना जग स्वप्नवत् भासू लागले किंवा ज्यांची चित्तवृत्ति सदैव ब्रह्मभूत झाली, त्यांच्याच आचरणावरून त्यास कर्म करता येते व तेहि धृतीने व उत्सा- हाने करता येते हे निर्विवाद सिद्ध होत आहे. मग आपल्या अज्ञानाने व भ्रांतीने या सिद्धांताच्या असंभवतेबद्दल लोकांच्या डोळ्यात विनाकारण धूळ फेकून रणे माजविण्यात हंशील काय ? कोल्हटकर यानी या बाबतीत अमृतानुभवाचे उतारे घेतले आहेत. आणि त्यावरून ज्ञानोत्तर ज्ञान्याला कर्म राहत नाही असे सिद्ध कर- ण्याचा प्रयत्न केला आहे. पण खुद्द ज्ञानेश्वरमहाराज यानी गीता ३.२० वर टीका करीत असता " देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाहि कर्तव्य असे उरले, लोकालागी । ” असे जे स्पष्ट विधान केले आहे ते कोल्हटकरांच्या लक्षात आले नाही. तुकारामबुवांचे मत असेच आहे आणि योगवासिष्ठातहि सप्तभूमिके- तून वर गेल्यावर रामास लोकसंग्रहार्थ निष्कामपणाने सर्व व्यवहार करण्याचा उप- देश केला आहे. गीतेत अर्जुनास तोच उपदेश आहे. ज्ञान्यास कर्म करता येणेच जर शक्य नाही तर या सर्व उपदेशकांची वाट काय ? अर्थात् ज्ञानी कर्म करतो इतकेच नव्हे तर लोकसंग्रहासाठी हे त्याचे कर्तव्य शिल्लक राहते असे यावरून सिद्ध होते. ज्ञान्यास विधि कोण सांगणार ? "ज्ञान्यास कर्मे करता येतात हे आपल्या ग्रंथातून अन्य ठिकाणी कोल्हट- करादिकानीहि कबूल केले आहे. अर्थात् ज्ञान्यास कर्मे अशक्य हा वाद त्यानी होऊनच सोडून दिला आहे. पण यापुढे त्यांचे असे म्हणणे आहे की, ब्रह्म- ज्ञान्याला कर्मे कर असे टिळक कोण सांगणार ? आणि हा प्रश्न विचारून तो निरुत्तर आहे अशा कल्पनेवर या टीकाकारानी रहस्यकारांचा उपहास करण्याची बरीच खटपट केलेली आहे. पण हा त्यांचा प्रयत्नहि मागच्याप्रमाणेच निष्फळ आहे. स्थितप्रज्ञाचे वर्तन सामान्य जनास विधिनिषेध घालून देण्यास समर्थ असते, स्थितप्रज्ञ त्याने बांधला गेला नाही तरी इतर लोक बांधले जातात, किंवा स्थित- प्रज्ञ विधिनिषेधाचा किंकर नसून जनक असतो, हा सिद्धांत गीतारहस्यात विस्तृत