पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ७ टीकाकाराना टिळकांचे उत्तर त्याना हे विवेचन कसे रुचणार ? त्यातूनहि सर्व सुख दुःखाभावरूप आहे अशी जी कित्येक संन्यासमार्गीयांची व्याख्या ती वस्तुस्थितीवरून सिद्ध होत नाही असे गीतारहस्यात दाखविले असल्यामुळे इतर सांप्रदायिकाप्रमाणे कोल्हटकरासहि राग आला आहे. ते म्हणतात की मुलाच्या तोंडात खडीसाखरेचा खडा घालण्याच्या पूर्वी खडीसाखरेबद्दलची व्यक्त इच्छा जरी त्याच्या मनात नसली तरी पुनर्जन्मवा- दाप्रमाणे बीजरूपाने ती त्याच्या मनात असली पाहिजे असे मानावे लागते. आमच्या मते ही कोटी शुद्ध तर्कटपणाची आहे. आधिभौतिक सुखाचा हा बाद आहे आणि या ठिकाणी आधिभौतिकरीत्या व्यक्त होणारी इच्छा जर दाखविता येत नाही, तर केवळ काल्पनिक बीजरूपी इच्छा गृहीत धरणे म्हणजे पयायीने प्रतिपक्षाचे मत कबूल करण्यासारखेच होय. जे दिसत नाही ते बीजरूपाने कोठेह आणि केव्हा हि असू शकेल, कारण त्यास दृश्य पुरावा केव्हाच मिळणार नाही, म्हणून असल्या काल्पनिक कारणापेक्षा आधिभौतिक शास्त्री हृदय कारणाचांच विचार करीत असतात. आणि आधिभौतिक सुख कशाला म्हणावयाचे याचा विचार करताना हाच न्याय आम्हीहि स्वीकारला पाहिजे. इंद्रियांच्या ठिकाणी तत्तद्विष- याबद्दलचे रागद्वेष व्यवस्थित म्हणजे मुळचेच स्वभावसिद्ध असतात असे जे गीतेत म्हटले आहे ते याच अभिप्रायाने होय. आणि गीतेचा हा स्पष्ट सिद्धान्त सोडून देऊन बीजवासनेच्या कल्पनेने संन्यास मार्गांचे प्रतिपादन करणे म्हणजे गीतेचा उपमर्द करून संन्यासमार्गाच्या कल्पनेस बळी पडण्यासारखे होय. रागद्वेषच बीज- रूपाने असतात असे जर कोल्हटकरांचे म्हणणे असेल तर त्यात काही विलक्षण नाही. पण तसे म्हटले म्हणजे राग आणि द्वेष या दोनहि वृत्ति स्वतंत्र होऊन सन्यासमार्गीय म्हणतात त्याप्रमाणे केवळ दुःखाभावासच सुख मानता येत नाही असे प्राप्त होते. किंवा गीतारहस्यात दिलेला सिद्धांतच अधिक दृढ होतो. ज्ञान्यास कर्म करणे अशक्य आहे काय ? "कोल्हटकरांनीच नव्हे तर दुसऱ्या टीकाकारानीहि ज्ञान्याच्या हातून कर्म घडणे अशक्य असल्यामुळे कर्मयोग त्यास संभवत नाही असे प्रतिपादन केले आहे. ज्ञानी म्हटला म्हणजे त्याच्या सर्व वासनांचा क्षय झालेला असून सर्व जग त्याला मिथ्या भासत असते आणि सदैव तो निर्विकल्प समाधीत रत असतो इत्यादि विधाने प्रथम करून ज्ञान्याला कर्म करता येणे शक्य नाही व कर्म रहातहि नाही असे हे टीकाकार निक्षून प्रतिपादन करीत असतात. जणु काय याना त्या स्थितीचा अनुभवच आलेला आहे ! पण आमच्या मते ही सर्व टीका आचरटपणाची आहे.. आचरटपणा हा शब्द कित्येकास कठोर वाटेल पण तो शब्द अगदी यथार्थ आहे. कारण या टीकाकारांच्या गुरुपरंपरेतले जे स्थितप्रज्ञ ज्ञानी पुरुष - उदाहरणार्थ शंकराचार्य किंवा ज्ञानेश्वरमहाराज — यानीहि कर्मे केली ही गोष्ट या टीकाकारांस सर्वथैव कबूल आहे. आणि यानी जर कर्मे केली तर सर्व वासनांचा क्षय झाल्या-