पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ 3 लो० टिळकांचे चरित्र भाग ७ मान निघू शकत नाही. गीतेतील योग म्हणजे लाभालाभ जयापजय वगैरेबद्दल समदृष्टि किंवा सारखी बुद्धि ठेवून कर्मे करण्याचा योग होय आणि हाच अर्थ ' योगस्थः कुरु कर्माणि ' ' योगमातिष्ठोतिष्ठ' वगैरे लोकात सांगितला असून 'योयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन' या ठिकाणीहि तोच योग विवक्षित आहे आणि खुद्द शांकरभाष्यातहि 'साम्य' म्हणजे 'समत्व' असाच अर्थ केलेला आहे. योग शब्दाच्या अर्थाचा शांकरभाष्य प्रमाण धरूनच याप्रमाणे निर्णय झाल्यावर ' तस्माद्योगी भवार्जुन' याचा अर्थ काय करावा त्याबद्दल शंकाच रहात नाही. या ठिकाणी शांकरभाष्यात काहीच खुलासा केलेला नाही हे खरे आहे. पण 'योगस्थः कुरु कर्माणि ' ' योगमातिष्ठोत्तिष्ठ' ' तस्माद्योगाय युज्यस्व' आणि 'कर्मयोगेन योगिनाम्' ही वचने लक्षात आणली म्हणजे योगी होण्याचा जो उपदेश भगवंतानी अर्जुनास केला आहे तो कर्मयोगी होण्याचाच उपदेश आहे. पातंजल योगी होण्याचा नव्हे, असे स्पष्ट होते. योगशब्दघटित उपदेश एकाच ठिकाणी आहे असे नाही; तीन चार ठिकाणी आहे. पैकी तीन ठिकाणी योग म्हणजे कर्मयोग असा अर्थ जर निर्विवाद आहे, तर चवथ्या ठिकाणी योगी म्हणजे पातंजल योगी असा अर्थ करणे म्हणजे सरळ, सामान्य, सर्वमान्य व शास्त्रीयग्रंथार्थनिर्णयपद्धतीचा त्याग करणे होय हे संप्रदायदूषित बुद्धीच्या माणसाखेरीज कोणाच्याहि लक्षात येईल. योगशब्दघटित जो उपदेश तीन ठिकाणी केला आहे तोच चवथ्या ठिकाणी असला पाहिजे. शिवाय 'सांख्य' आणि 'योग' अशा ज्या दोन निष्ठा गीतेत सांगितल्या आहेत, त्यासच पर्याय शब्द म्हणून 'संन्यास' आणि 'कर्मयोग' हे शब्द जर गीतेतच (गी. ५.२ ) वापरलेले आहेत, तर गीतेतील 'योग' म्हणजे कर्मयोग याबद्दल काहीच शंका रहात नाही. रहस्यकारांचा व सांप्रदायिक टीकाकारांचा जो मुख्य मतभेद आहे तो हाच होय, आणि ज्या चिकित्सापद्धतीने गीतारहस्यात या मताचे समर्थन केले आहे ती चिकित्सापद्धति सदोष आहे, असे न दाखविता नुसत्या गुरुपरं- परेच्या आधारावर हे मत खोडून टाकण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डोळे बांधून उजेडाची चिकित्सा करण्याइतकेच असमंजसपणाचे होय. सुखदुःखविवेचन 'गीतारहस्याच्या पाचव्या प्रकरणात सुखदुःखाच्या स्वरूपाचे जे विवेचन केले आहे त्यातील मर्म कोल्हटकरांच्या बिलकुल लक्षात आले नाही. आधिभौतिक सुखाची व्याख्या करून नंतर त्यातूनच मानसिक किंवा आध्यात्मिक सुखाच्या पायरीवर कसे जाता येते याचे या प्रकरणात आम्ही विवेचन केले आहे आणि हे विवेचन बन्याच अंशी नव्या पद्धतीने केलेले आहे. पण त्यातील अखेरचा सिद्धांत वेदांतशास्त्रास धरून आहे हे सांगावयास नको. तथापि गुरुपरंपराच ज्यास प्रमाण किंवा गुरुपरंपरेहून भिन्न असे विवेचनच असणे शक्य नाही अशी ज्यांची समजूत