पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भागे ७ टीकाकाराना टिळकांचे उत्तर ६१ आहे पण संस्कृतात गेंड्याच्या शिंगालाच नव्हे तर खुद्द गेंड्यालाहि खड्ग म्हण- तात आणि मेदिनी व विश्व या संस्कृत कोशात खड्ग- गेंडा हा शब्द बौद्ध संन्याश्यासहि लागतो असे म्हटले आहे. एका पंथाचे का होईना पण खुद्द संन्यासी लोकच जर आपणास गैंडा म्हणण्यात भूषण मानीत होते तर रहस्य- कारानी त्यांच्याच शब्दानी त्यांची संभावना केल्यास कोल्हटकरादिकास संताप का यावा याचे कारण आम्हास समजत नाही. संन्याश्यापैकी एका पंथातील लोकास 'गैंडे' हे नावच संस्कृतात रूढ झालेले आहे. असला पंथ गीता प्रशस्त मानीत नाही आणि रहस्यकारहि प्रशस्त मानीत नाहीत. मग कोल्हटकरास त्या- बद्दल काहीहि वाटो. योग- शब्दार्थ 'दुसरा मुद्दा गीतेतील योग शब्दाच्या अर्थाबद्दलचा होय आणि याबद्दल चर्चा करताना आपण काय म्हणतो याचेच नव्हे तर आपले गुरु काय म्हणतात याचेहि भान कोल्हटकराना राहिलेले नाही हे सहज दिसून येण्याजोगे आहे. योग शब्दाचे अनेक अर्थ आहेत म्हणून एखाद्या ग्रंथात त्या शब्दाचा काय अर्थ आहे हे त्या ग्रंथातील व्याख्येवरूनच ठरविले पाहिजे. दुसन्या ग्रंथातील व्याख्या : घेऊन उपयोगी नाही. गीतेत 'समत्वं योग उच्यते' अशी योग शब्दाची स्पष्ट व्याख्या केलेली आहे (गी. २. ४८) आणि तेथेच समत्व म्हणजे काय हे 'सिद्धयसिद्धयोः समो भूत्वा ' या शब्दानी सांगितले आहे. 'सिद्ध्यसिद्धि' यातच मानापमान लाभालाभ जयापजय इत्यादींचा समावेश होतो हे सांगावयास नको. आचार्यांनी शांकरभाष्यात समत्वाचा असाच अर्थ केलेला आहे आणि गी. २. ५० श्लोकात सांगितलेले 'कर्मसु कौशलम्' याचा अर्थहि समत्वरूप कौशल असाच शांकरभाष्यात असून केला तोच गीतारहस्यात घेतलेला आहे. सारांश या बाबतीत शंकराचार्याचाच अर्थ गीतारहस्यात स्वीकारला आहे किंवा कोल्हट- करांची गुरुपरंपरा रहस्यकारास अनुकूल आहे ? पण या सर्वांचा विपर्यास कौशल म्हणजे सुतार लोहार इत्यादिकाचे काम करण्याचे प्रावीण्य असा कोल्हटकरानी अर्थ करून तो रहस्यकाराच्या माथी मारला आहे आणि मग गुरुपरंपरेच्या विरुद्ध जाण्याबद्दल रहस्यकारास निष्कारण दूषणे दिली आहेत ! इंग्रजीत अशी एक म्हण आहे की 'एखाद्या कुत्र्यास फाशी द्यावयाचे असल्यास त्यास प्रथम तो पिसाळला आहे वगैरे काही तरी वाईट नाव द्यावे व मग त्यास फाशी द्यावे. ' कोल्हटकरांची कृति याच मासल्याची झाली आहे. मग रहस्यग्रंथ तातडीने वाचला असल्यामुळे त्यांच्या हातून हा प्रमाद होवो किंवा दुसऱ्या काही कारणामुळे होवो. वरील श्लोकावरचे शांकरभाष्य त्यानी एक तर लक्षपूर्वक वाचले नसावे किंवा वाचून त्याना कळले नसावे किंवा कळूनहि विपर्यास केला असावा याखेरीज इतर अनु- टि० उ...४१