पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ १९१४-१९१५ मधील निवडक पत्रे ४७ टिळकासारखा निकाल दिला. तरी त्याचा उल्लेख करून एक छापील चिठ्ठी चिरो- लच्या पुस्तकात घालण्याला आम्ही तयार आहोत. तसेच किरकोळ चुकाची दुरुस्ती सुचवाल तर तीहि घालू. पण माफी मागणे किंवा दंड म्हणून धमार्थ देणगी देणे या गोष्टी आम्ही मुळीच करणार नाही.' त्यावर आम्ही आमचे बॅ. स्पेन्स यांचा विचार घेतला. त्यांच्या मते माफी देत नाहीत तर एकदम फिर्यादच करावी. आमच्यामते आपली बाजू बळकट आहे म्हणून कैफियत देण्याच्या वेळी प्रतिपक्षाचे डोळे उघडतील. अमुक बॅरिस्टर दिला तमुक बॅरिस्टर दिला अशी नावे तिकडे प्रसिद्ध होतात तरी असे न व्हावे. (३०) बेशन्टबाई यांची केळकराना तार मुंबई २६ डिसेंबर १९१५ माझी उपसूचना मंजूर झाली. काँग्रेस कमिटीने ती मान्य केली. आता सर्वाना मार्ग खुला झाला. परिशिष्ट २ चोराच्या उलट्या बोंबा ! काँग्रेसमधील समेटाचे बोलणे का मोडले, याबद्दल अमृतबझार पत्रिका- कारानी आपल्या प्रत्यक्ष माहितीवरून दिलेली हकीकत केसरी पत्रात प्रसिद्ध झाल्यापासून येथील ना. गोखले यांच्या छायेतील मंडळीस व पत्रकारास क्रोधाची वैषम्याची, मत्सराची व दुसऱ्याचा घात करण्याची ग उसळी येऊन त्यानी आपले पूर्वीचे खेळ पुनः सुरू केले आहेत. वास्तविक म्हटले म्हणजे हा तंटा ना. गोपाळ कृष्ण गोखले व रा. टिळक यामधला आहे, व तो दोघातच चालला असता तर त्यात काही निदान असभ्यपणाचा तरी भाग आला नसता. पण ना. गोखल्याऐवजी गोपाळ कृष्णाच्या खेळगड्यानी तो आपल्या हातात घेतल्यामुळे अर्थातच त्यात खेडवळाची ग्राम्यता उत्पन्न झाली असून आपण काय बोलतो व त्याचा कायदेशीर परिणाम काय होईल अथवा त्याला सत्याचा आधार कितपत ठेवावा याचाहि या सर्वेटास अदमास राहिलेला नाही. खोटे उतारे, खोटा कोटि- क्रम, अश्लीलता आणि जाणूनबुजून केलेला विपर्यास त्यांच्या प्रतिपादनात इतका भरला आहे की त्याबद्दल कोणासहि किळस येणे स्वाभाविक आहे. अशा