पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र संन्यासमार्गीयावर टीका. भाग ७ " आता कोल्हटकरांच्या मुद्याकडे वळू. त्यानी आपल्या ग्रंथाच्या अखेरीस २१ मुद्दे काढले आहेत परंतु त्यांची छाननी केली असता त्यातील ७/८ च खरे मुद्दे निघतात, व ते केवळ कोल्हटकरांचेच आहेत असे नाही तर वे. हुपरीकर, बापट, लेले यानीहि त्यांचाच पुनः पुनः खल केलेला आहे सबब या मुद्यास सामान्यतः उत्तर दिले म्हणजे ते सर्वांनाच लागू पडेल, प्रत्येकास निराळे उत्तर द्यावयास नको. कोल्हटकरांच्या मुद्यात विशेष काय तो चरचरीतपणा. त्यास उत्तर वर आलेच आहे. या मुद्यापैकी पहिला मुद्दा म्हटला म्हणजे संन्यासमार्गाची रह- स्यात निंदा करून त्यास गेंडे म्हटले हा होय. संन्यासमार्गीयांची ही निंदा ऐकून बापटशास्त्रत्रांचे डोके फिरले आहे पण दुःखाची गोष्ट ही की, संन्यासमार्गीयाबद्द- लचे हे विवेचन कोणास उद्देशून आहे हे बापटासहि कळले नाही, व कोल्हटक- रासहि कळले नाही. आचार्यांनी म्हटल्याप्रमाणे ' अंग गलितं पलितं मुंड ' अशी स्थिति प्राप्त झाल्यावर जे संन्यास घेतात त्याबद्दल अगर नुसते अविवाहित अगर ब्रह्मचारी राहणान्याबद्दल रहस्यकारांचे काही एक म्हणणे नाही हे प्रथमतः लक्षात ठेविले पाहिजे. (गी. र. पृ. ३०१।२ पहा). गीतारहस्यात ज्या संन्यासमार्गावर टीका केलेली आहे त्यात केवळ वैदिकच संन्यासी येतात असेहि नाही. बौद्ध, जैन व विस्ती संन्यासमार्गीहि येतात. शंकराचार्याच्या मार्गासच उद्देशून तो शब्द घातलेला नाही. उलट निष्काम कर्म हे अकर्म होते असे जे आचार्यांचे मत त्याचाहि उल्लेख रहस्यात केलेला आहे. ज्ञानोत्तर जगाचा कंटाळा येणे किंवा ब्रह्मबुद्धीने सर्व व्यवहार करणे या दोहोपैकी पहिल्यास उद्देशून संन्यास या शब्दाचा गीतारह- स्यात उपयोग केलेला आहे. गीतेत जो संन्यास सांगितला आहे तो दुसऱ्या प्रका- रचा म्हणजे बुद्धिस्य संन्यास होय. तो रहस्यकारास संमत आहे इतकेच नव्हे तर त्याचे रहस्यात सर्व प्रकारे समर्थन केले आहे. गीतारहस्यकारांचा संन्यासावर जो काही कटाक्ष आहे तो खरूपतः कर्मसंन्यासावर, बुद्धिस्थ संन्यासावर नाही. कोल्हटकर म्हणतात आचार्यास हा बुद्धिस्य संन्यास संमत आहे ठीक आहे. असे असल्यास इष्टापत्तीच म्हणावयाची आणि रहस्यकारानीहि तिचा उल्लेख केला आहे. पण शांकरभाष्य लक्ष- पूर्वक वाचल्यास आचार्यांचा विशेष कटाक्ष कर्मसंन्यासावर आहे असे कोणास हि दिसून येईल. गीतेस हा संन्यास पसंत नाही आणि हेच काय ते रहस्वकारांचे सांगणे आहे. गीतेत कर्मसंन्यास कोठेहि सांगितलेला नाही. हुपरीकर म्हणतात की सर्व कर्मे सोडावी असे गीता म्हणते पण तो श्लोक व त्यासारखे इतर लोक पाहता हा स्वरूपतः कर्मत्याग नव्हे फलत्याग आहे असे कोणासहि सहज कळून येईल. स्वरूपतः कर्मत्याग करून रानात राहणे यासच गेंड्यासारखे राहणे असे म्हणतात व याप्रमाणे संन्याश्यानी रहावे म्हणून “एको चरे खग्गविसाणकप्पो " (गी. र. ५७६.) असा सुत्तनिपातातील एका पाली सूत्रात ४१ दा बौद्ध संन्या- श्यास उपदेश केलेला आहे. खग्गविसाण याचा अर्थ पाली भाषेत गैंडा असा