पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ टीकाकाराना टिळकांचे उत्तर ५९ अत्यंत अनुचित होय. गीतारहस्यकाराना ही पद्धत मान्य नाही किंवा ती स्वीका- रून त्यानी आपला रहस्यग्रंथहि लिहिला नाही. गीतेचा स्वतंत्र रीत्या खरा अर्थ काय निघतो हे सांगण्याकरिता गीतारहस्य प्रवृत्त झाले आहे आणि ही गोष्ट लक्षात न ठेवता गुरुपरंपरेचा पडदा डोळ्यास बांधूनच जर कोणास परीक्षण करावयाचे असेल तर त्याचा हात धरण्याची आमची बिलकुल इच्छा नाही एवढेच आमचे याबद्दल रा. कोल्हटकर यास उत्तर आहे. आधुनिक ग्रंथचिकित्सकाचा हा मार्ग नव्हे. "कोल्हटकरांच्या ग्रंथाचा तीनचतुर्थांश भाग वर सांगितल्याप्रमाणे सण- सणीत पण दोषाई आंधळ्या पद्धतीचा परिणाम असल्यामुळे त्या पद्धतीसंबंधाने दोन शब्द सांगावे लागले. टीका करण्यास शिव्याच द्याव्या लागतात असे नाही; कारण वे. शा. सं. हुपरीकरशास्त्री हे जरी संप्रदायानुयायी आहेत तरी कोल्हट- करांचा शिवराळपणा त्यांच्या ग्रंथात कोठेहि दिसून येत नाही. पण कोल्हाटकरास शिन्याहि गुरुपरंपरागतच वाटतात असे दिसते. आपल्या ग्रंथाच्या पहिल्याच प्रकर- णात अधिकारयोग सांगून रहस्यकारास गीतार्थ सांगण्यास त्यानी अनधिकारी ठरविले आहे. पण आम्ही या रामदुर्गच्या कारभाऱ्यास असे विचारातो की त्यानी तरी कोठे पंचाग्रिसाधन केले होते ? सरळ व रसाळ संस्कृत भाषेत अर्जुनाला निमित्त करून लोकोद्धारार्थ सांगितलेल्या गीतेचा अर्थ करण्यास तपश्चर्येशिवाय दुसरा मार्ग नसेल तर हा ग्रंथच महाभारतात घालण्याचे काही कारण नव्हते असे आम्ही म्हणतो. ' इदं ते नातप्रस्काय ' इत्यादि श्लोक कोल्हटकर प्रमाणार्थ घेतात पण या श्लोकाचा अर्थ त्यास कळला नाही असे आम्ही सांगतो. नास्तिकाला गीता सांगू नये हे खरे पण त्याचे कारण त्याला त्याची गोडी नसते हे होय अर्थ समजत नाही हे नव्हे. कोल्हटकर तपस्वी नसून जर टीका करतात तर इतरा सहि तसे करण्यास हरकत काय ? श्रीकृष्णापासून कोल्हटकरापर्यंत अविच्छिन्न गुरु- परंपरा लागलेली आहे काय ? नाही. किंबहुना आद्य शंकराचार्यापासून कोल्हट- करापर्यंतहि ती अविछिन्न लागलेली नाही. ग्रंथावरूनच जर अर्थ लावावयाचा तर तो अधिकार अमक्याला आहे आणि तमक्याला नाही इत्यादि रिकाम्या गप्पा मार- यात अर्थ काय ? किंबहुना कोल्हटकराना देखील त्यांची गुरुपरंपरा कळलेली नाही आणि या परंपरेच्याच नव्हे तर वेदांतशास्त्राच्याहि विरुद्ध त्यानी काही सिद्धांत प्रतिपादिले आहेत असे आम्ही दाखविणार आहो. कोल्हटकरांचा गुरु जिवंत असल्यास त्याचा त्यानी कोठे उल्लेख केला नाही. शंकराचार्यासच ते गुरू सम- जतात व ते गुरुत्व ग्रंथद्वारा जसे कोल्टकरास तसे आम्हासह ग्राह्य आहे. पण वैश्वदेवाच्या वेळी बापाचा कासोटा काही कारणामुळे सुटत होता म्हणून मुलानेहि पुढे तसे करण्याचा आग्रह धरावा असे म्हणण्यास कोल्हटकराप्रमाणे आम्ही तयार नाही. हा मूर्खपणा होय असे आम्ही समजतो; मग ते कोणास पसंत पडो वा न पडो.