पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ प्रत प्रथमतः अर्पण करून त्यातहि कोल्हटकर यानी आपली अनुकरणेच्छा तृप्त करून घेतली आहे. पण या गोष्टी विशेष सांगत बसण्यात काही हंशील नाही. ग्रंथातील चरचरीत शिव्या बाजूला ठेवून त्याचे आपणास परीक्षण केले पाहिजे. तशा दृष्टीने कोल्हटकरांच्या अंथाचा विशेष काय तो आता थोडक्यात सांगतो. गुरुपरंपरागत अर्थ "कोल्हटकराना गीतेचा अर्थ आपल्या गुरुसंप्रदायाप्रमाणे लावावयाचा आहे आणि रहस्यकाराना तो सर्वसंप्रदाय-स्वतंत्र पद्धतीने लावावयाचा आहे. दोघांचे मार्गच भिन्न. एक जाणार पूर्वेस तर दुसरा जाणार पश्चिमेस. मग दोघांची एक- वाक्यता होणार कशी ? कोल्हटकरांनी गीतारहस्यातील पहिले प्रकरण जर नीट लक्ष लावून वाचले असते तर त्यांची चूक त्यांचे नजरेस आली असती. टिळक चुकले का कोल्हटकर चुकले हा प्रश्न नाही. ग्रंथाचा अर्थ कसा लावावयाचा हा मुख्य मुद्दा आहे. गुरूने चतुर्थी सांगितली म्हणजे चतुर्थी म्हणावयाची किंवा व्याकरण न्याय बगैरे पाहून ती चतुर्थी आहे का षष्ठी आहे हे ठरवावयाचे १ या बाबतीत गुरूपेक्षा पाणिन्यादिकांचा अधिकार अधिक असल्यामुळे गुरुपरंपरा म्हणजे एक प्रकारे अंधपरंपरा होय. आधुनिक ग्रंथचिकित्सक ग्रंथाचा अर्थ कर- ताना ही पद्धत स्वीकारीत नाहीत हे एल् एल्. बी. झालेल्या कोल्हटकरास आम्ही सांगावयास पाहिजे असे नाही. सांप्रदायिक अर्थ संप्रदायसिद्धयर्थं अवश्य असतात हे गीतारहस्यकारानीहि कबूल केले आहे. पण ते ग्रंथाचे खरे अर्थ नव्हत. शिवाय कोल्हटकर यांस अशीहि शंका आली नाही की गुरुपरं- परा पहावयाची तर एकाच संप्रदायाची का पहावी ? शंकराचार्यानी गीतेचा जो अर्थ केला आहे तो रामानुजाचार्यांनी किंवा मध्वाचार्यांनी केला आहे काय ? नाही. किंबहुना शंकराचार्याना वाट पुशीत आपली टीका लिहिणारे ज्ञानेश्वरमहाराज यानीहि काही अर्थ शांकरभाष्याहून निराळे केले आहेत. मग गुरुपरंपरा राहिली कोठे ? गुरूचा उपदेश घ्यावा गुरूला मान द्यावा गुरूचा अनु- भव शक्य तितका आपल्या अंतःकरणात उतरून घ्यावा त्याची शांति त्याचे सदा- चरण त्याचे ब्रह्मज्ञान होईल तितके संपादन करण्याची उमेद बाळगावी इ. गोष्टी रहस्यकारासहि मान्य आहेत. पण जो ग्रंथ सर्व संप्रदायास सामान्य आहे त्याचा अर्थ एका विशिष्ट संप्रदायाने अमुक प्रकारे केला तर जगातील इतर सर्व मनुष्या- नीहि तसाच अर्थ लावला पाहिजे असे म्हणणाऱ्या पुरुषास “तातस्य कूपोयमिति ब्रुवाणाः क्षारं जलं कापुरुषाः पित्रति ” या काटीत आधुनिक चिकित्सक काढीत असतात. गुरुपरंपरा तंतोतंत स्वीकारणे म्हणजे चिकित्सकबुद्धीस खो घालणे होय. आणि असा खो घातला म्हणजे ज्ञानाचीच नव्हे तर जगाचीहि प्रगति बंद होईल. एखाद्या शास्त्रयाने असे सांगितले असते तर आम्हास त्याचे नवल वाटले नसते पण ज्ञानप्रकाशप्रेरित एखाद्या एल् एल्. बी. ने असे साहस करणे आमच्या मते