पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ टीकाकाराना टिळकांचे उत्तर ५७ तली. ते म्हणाले की, गीतारहस्याचे एक पुस्तक ज्ञानप्रकाशकाराकडे प्रथमच अभिप्रायार्थ पाठविले होते. पण चरचरीत टीका करण्यास इंदुप्रकाशकारास ज्याप्र- माणे प्रो. भानु मिळाले तसा गीतारहस्यावर विरुद्ध लिहिणारा कोणी इसम ज्ञान- प्रकाशकारास पुण्यक्षेत्री मिळेना. प्रो. भाटे, प्रो. रानडे, डॉ. गुणे वगैरे गृहस्था- कडे त्यानी खेपा घातल्या असे त्यानीच प्रस्तावनेत म्हटले आहे पण काय झाले कोणास ठाऊक ! या गृहस्थास सोडून ज्ञानप्रकाशकारानी यमाच्या दिशेकडे धाव घेतली. तेव्हा शोधता शोधता अखेरीस रहस्यावर प्रहार करण्यासाठी त्यानी सज्ज केलेल्या धनुष्यास बाण लावण्यास दत्तभक्त रा. कोल्हटकर हे त्यास रामदुर्गास सापडले. मागे ज्ञानप्रकाशकाराची लगट असल्यामुळे त्यानी "शक्य त्या तातडीने " ग्रंथ वाचून चरचरीत टीका तयार केली, पण मध्ये कोठे तरी खो येऊन अखेरीस रहस्यानंतर एक वर्षांने ती प्रसिद्ध झाली आहे. कोल्हटकरांची भाषाच पहावयाची तर ती बरीच चरचरीत व गालिप्रचुर आहे याबद्दल कोणासच शंका यावयाची नाही. रहस्यकाराच्या कृतीस 'आसुरी ' ठरवून ' हे ' राजस' गृहस्थ कलियुगात ब्राहाणयोनीत राष्ट्रभक्तिमिषाने धर्म बुडवण्याकरिता उत्पन्न झाले आहेत,' इत्यादि काही संस्कृत व काही प्राकृत शेलक्या शिव्यांचा रा. कोल्हटकर यानी ठिकठि- काणी उपयोग केला आहे. किंबहुना जेथे जेथे प्रमाणांची उणीव पडली तेथे तेथे रामदुर्ग संस्थानातील कारभाऱ्याच्या जागेवर असणाऱ्या या गृहस्थानी ती उणीव अशाच प्रकारे भरून काढली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. पण दुर्दैव ज्ञान- प्रकाशकाराचे की, रामाशी स्पर्धा करणाऱ्या या धनुर्धराचे बाण गालियुक्त असू नहि बोथट झाले आहेत. गीतारहस्यावरील या टीकेत तुरुंगाचाच नव्हे तर राज- कीय पक्षातील जहाल- मवाळांचाहि उल्लेख केलेला आहे, व रहस्यातील सिद्धां- ताची मोठ्या कुत्सिकपणाने राजकीय जहाल पक्षाशी कोल्हटकरानी जोड घालून देऊन मवाळ ज्ञानप्रकाशकाराचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. टीका करण्याच्या असल्या पद्धतीस काय नाव द्यावे हे आम्ही सांगू इच्छित नाही. रा. कोल्हटकरास आम्ही इतकेच सांगतो की, राजकीय बाबतीत जहाल आणि मवाळ हे पक्ष होण्यापूर्वी वीस पंचवीस वर्षे गीतारहस्यातील विचाराचा उगम झालेला आहे. अनुकरण "असो. कोल्हटकरांच्या ग्रंथाची उत्पत्ति जरी याप्रमाणे असली तरी त्यानी आपल्या ग्रंथाची अर्पणपत्रिका व प्रकरणे लिहिताना व सामान्यतः मांडणी करि- ताना गीतारहस्याचेच अनुकरण केलेले आहे. आपणास कोणतीहि गोष्ट प्रिय असल्यावरच आपण तिचे अनुकरण करितो या न्यायाने पाहिले तर रा. कोल्हट कर यानी पर्यायाने अजाणतेपणाने या बाबतीत रहस्याची स्तुतीच केली आहे असे म्हटले पाहिजे. किंबहुना गीतारहस्याची एक प्रत प्रथमतः पंढरीच्या विठोबास ज्या- प्रमाणे अर्पण करण्यात आली त्याप्रमाणे वाडीच्या दत्तास आपल्या ग्रंथाची एक