पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ वाचून तरुण लोकांची शंकराचार्याविषयी आधीच झालेली अप्रीति व अनादर बुद्धि शिथिल न होता अधिक वाढली. कारण टिळकानी जरी आचार्याना तत्त्व- वेत्ते वगैरे म्हणून गौरव केला आहे तरी आचार्य हे आग्रही आहेत व गीतेच्या भाष्यात त्यानी पदरचे शेरे लिहिले असे म्हणून टिळकानी त्याना पायाखाली तुडविण्याचा प्रकार केला आहे. यामुळे आचार्याविषयी आदबुद्धि दाखवून वरून उगाच दाढीला हात लावण्याचा जो प्रकार त्यानी केला तो यशस्वी होणार नाही. " रामदुर्गचे कारभारी कोल्हटकर हे भागवतधर्मी असून त्यानीहि गीतारहस्यावर बरीच टीका केली होती. शिवाय ती बरीच व्यक्तिविषयकहि होती. असो. अशा रीतीने प्रतिकूल टीकांचे उतारे देत बसलो तर जागा पुरणार नाही. परंतु वरील उताऱ्यावरून काही काही वर्गात गीतारहस्याची संभावना कशी झाली हे दिसून येईल. अनुकूल टीकाकारांपैकी दोन ठळक उदाहरणे सांगता येतील. एक 'रहस्यदीपिका' लिहिणारे भिडे शास्त्री हे जुन्या वर्ग- पैकी व चिंतामणराव वैद्य हे नव्या वर्गापैकी, या दोहोंच्या ठिकाणी शंकराचार्यावि- षयी आदरबुद्धि असली तरी टिळकाविषयी तशीच होती. म्हणून भिडे शास्त्री यानी होता होईतो दोघानाहि संभाळून घेतले आहे. व वैद्य यानी तर टिळकांच्या इत केच किंबहुना टिळकापेक्षाहि आपण काकणभर अधिक प्रवृत्तिमार्गी आहो असे भासविले आहे. कर्मपक्ष व अकर्मपक्ष या दोहोनाहि गीतेत प्राधान्य दिलेले नाही. फक्त त्यातल्यात एक दुसऱ्याहून श्रेष्ठ असे टिळकानी म्हटले. पण वैद्यांच्या मता- प्रमाणे कर्मपक्ष व अकर्मपक्ष हे दोन्ही प्रधान मानावे ही गोष्ट देखील भगवंताना गीतेत मान्य नव्हती असे वैद्य यानी प्रतिपादिले आहे. ( ९ ) टीकाकाराना टिळकाचे उत्तर असो. या व इतर टीकातील प्रत्येक मुद्दा घेऊन टिळकानी उत्तर दिलेले आढळत नाही. टीकेला उत्तर देत बसण्याला त्याना वेळहि नव्हता. व ते उत्तर देत गेले असते तरी ते केव्हाहि न संपणारे असेच काम होते. पण स्वतः टिळकांच्या शब्दानीच गीतारहस्याचे तात्पर्य आम्ही मागे या प्रकरणात दिले आहे. त्याच- प्रमाणे विशिष्ट टीकाकाराना टिळकानी दिलेले एक उत्तर उपलब्ध आहे. हे उत्तर टीकाकाराना जशास तसे याच न्यायाने दिलेले आहे. तथापि तसे करताना इतर अनेक आक्षेपहि टिळकांच्या डोळ्यापुढे होते व त्यानाहि उत्तरे त्यानी ह्याच उत्तरात दिली आहेत. म्हणून ते एक उत्तर वाचले असता कोणत्याहि टीका- काराच्या मुख्य मुद्याला त्यात उत्तर मिळते असे वाटते. म्हणून ते समग्र उत्तर आम्ही खाली देत आहो:- कोल्हटकर ज्ञानप्रकाश - योग. पहिले प्रवचन रा. कोल्हटकर यांच्या विचारसरणीवर होते, व प्रथमतः त्यांचा ग्रंथ कसा निर्माण झाला याबद्दल रा. टिळक यानी थोडी माहिती सांगि-