पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ५५ आपला सिद्धान्त मांडण्याकरिता वकिली बाणा बराच दाखविला व आडरानात ते शिरले असे त्यांचे मत झाल्याचे दिसते. त्यांचे म्हणणे असे की "टिळकानी भगवद्भक्तीची मुमुक्षूंची व संन्याशांची विनाकारण टवाळी केली. केवळ गीतेतील शब्दवलावर त्यानी गीतेचे तात्पर्य काढले. टिळकांचा सांप्रदाय हा शुद्ध वैदिक सांप्रदाय नाही. गीतेचा अर्थ लावताना श्रुतिसंगति जितकी ठेवावयास पाहिजे तितकी त्यानी ठेविली नाही. टिळकानी जनकाचे उदाहरण दिले पण त्याची संसिद्धी ही कर्मयोगाची संसिद्धि नसून निवळ चित्तशुद्धि होय. श्रीकृष्णाने दिलेली म्हणून स्वतःची उदाहरणे टिळकानी कर्मयोगपर घेतली. पण ती केवळ पर- मार्यावस्थेतील नाहीत. कारण शुद्ध परमार्थात व्यवहार उरत नाही. शंकराचार्यांनी मुंडनरूप स्मार्त संन्यासाला खरे महत्त्व दिले नसता त्यांच्यावर तसा वृथा आरोप करण्यात आला. 'जशास तसे' हे टिळकांचे तत्व राजकारणातले आहे. ब्रह्म- वादातले नाही. व ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने ते गौण आहे. " इत्यादि इत्यादि. ' दीनमित्र' वर्तमानपत्रात एक नांगऱ्याहि टीका करण्याला पुढे सरसा- वला. दुसऱ्या एकाने असा आक्षेप घेतला आहे की 'न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानाम् कर्मसंगिनाम् || याच्या आधारावर आपल्या कर्मयोगाची उभारणी करण्यात टिळकांचा खरा हेतू असा की हल्लीच्या काळात जे अशिक्षित लोक शिक्षणाशिवाय आपली नित्य कर्मे करीत आहेत त्याना अज्ञानात तसेच राहू द्यावयाचे. शिकू द्यावयाचे नाही. जागृति होऊ द्यावयाची नाही. सुधारू द्याव याचे नाही. अर्थात् टिळकांचा कर्मयोग म्हणजे ती ब्राह्मणांची लबाडी होय. " सुबोध पत्रिकेला असा राग आला की "टिळक राजकारणात मिरवीत होते ते ठीक होते. पण धर्म व तत्वज्ञान यांच्या क्षेत्रातील मूर्धाभिषिक्त राजे म्हणजे रानडे भांडारकर इत्यादि लोकच होत. अर्थात् गीतारहस्य लिहून टिळकानी या मोठ्या गृहस्थांच्या पायरीला पाय लावला व इतकेहि करून सांगितले त्यात नवे काहीच नव्हते. कारण जे टिळकानी आज सांगितले रानडे भांडारकर यानी पूर्वीच सांगितलेले आहे. फक्त टिळकाना त्याची आठवण राहिलेली नाही इत- केच काय ते. पत्रिका म्हणते "टिळकानी नवे ते काय सांगितले ? गीता प्रवृ- त्तिपर आहे की निवृत्तिपर आहे ही शंका आम्हा प्रार्थनासमाजिकाना कधीच आलेली नाही. टिळक कर्मयोगपर गीता ठरविण्याला परवा परवांचे मिस्टर ब्रूकस यांचा आधार घेतात. पण एकाहि प्रार्थना समाजातील आचार्यांचा आधार घेत नाहीत. " ८ गिरीराव अण्णा हे तुकारामाचे भक्त त्यानी असा आक्षेप घेतला की 'जशाच तसे' हे तत्त्व गीतेत नाही. टिळकानी ते उगाच घुसडून दिले आहे. ' समत्व ' झाले म्हणजे 'जशास तसे' हे उरतच नाही. 'ज्ञानोदया'ने टीका केली तीत त्याने असे म्हटले की "वर्णाश्रम धर्मा- भिमानी लोकाना टिळकांचे विवेचन प्रामाणिक वाटणार नाही. आणि गीतारहस्य