पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ स्वरूपतः संन्यास असा अर्थ शंकराचार्यावर त्यानी उगाच लादला. कारण आचा यचा मूळ अर्थ संकल्पित संन्यास असा होता. ' पण मौज ही की पुराण मत- वादित्वाच्या पठाडीपैकीच भाऊशास्त्री लेले यानी शंकराचार्यांचे खरे मत म्हणून काय होते व त्याविषयी त्यांचा आग्रह कसा होता हे दाखविले असल्याकारणाने त्यांच्याकडून गोविंदसुत चिंचाळकराना परस्परच उत्तर मिळाले आहे. आणि अशा रीतीने प्रत्येकाचे आक्षेप टिळकावर वेगळे पण एकाचा आधार दुसरा ढास- ळतो व दुसऱ्याचा आधार तिसरा ढासळतो असाच प्रकार झालेला या टीकेच्या क्षेत्रात पहावयास सापडेल. प्रो. भानू यांचा आक्षेप असा की "शंकराचार्यांनाहि लोकोद्धाराची उत्कट इच्छा असताना त्याना टिळकानी विनाकारण सांप्रदायिक असे ठरविले. टिळकांचा सांप्रदाय व शास्त्रीय आर्य संस्कृति यांचा विरोध आहे. अपरोक्ष ज्ञानानंतर बुद्धि- पूर्व कर्म उरत नाही आणि त्याला कर्म करा असे सांगण्याचा कोणालाहि अधिकार रहात नाही. कुंभाराच्या चक्राप्रमाणे तो केवळ सवयीने कर्म करील व ते केवळ लोकसं- ग्रहकारकच असेल. पण ते लोकसंग्रहकारक असले म्हणून करणाऱ्याची इच्छा लोकसंग्र- हाचीच असते असे ठरत नाही. ब्रह्मस्वरूपता व कर्म ही एकत्र नांदू शकत नाहीत म्हणून खरे ज्ञान ज्याला झाले त्याला कर्म करावयास सांगणे हे विपरीत आहे. टिळकाना अपरोक्ष ज्ञान नाही म्हणून त्यांच्या लिहिण्याला महत्त्व नाही. त्यांच्या अंगी विवेक मुरला असता तर त्यानी गीतारहस्य लिहून शंकराचार्याशी विरोध केला नसता. टिळकानी शास्त्रविरोधी तत्वे प्रतिपादिली आहेत. गीता प्रवृत्तिपर नसून निवृत्तीपर आहे." पण दुर्दैवाने त्यांची टीका प्रसिद्ध झाली त्याच वेळेस स्वतः त्यांच्या गीतेवरील व उपनिषदावरील प्रचंड मराठी भाष्यातील उतारेच एकाने प्रसिद्ध करून भानूनी वेदांत प्रवृत्तिपर लावला असे दाखविले. 'वऱ्हाड समाचार' पत्नात अशीच जुन्या मताच्या दृष्टीची टीका आली होती. हा टीकाकार भक्तिमार्गी म्हणून त्याला असा राग आला की टिळकानी 'भक्तीची' तिसरी निष्ठा मानिली नाही तर केवळ निष्ठेचे साधन मानिले अर्थात् भक्तीला गौणत्व आणिले. वास्तविक गीता सांगणाराने जर दोनच निष्ठा मानिल्या तर टिळक आपल्या पदरची तिसरी निष्ठा कोठून मानणार ? आणि मौज ही की तिसरी निष्ठा न मानल्याबद्दल टीकाकार टिळकाना दोष देतो पण 'लोके- स्मिन् द्विविधा निष्ठा' असे स्पष्ट म्हणणाऱ्या भगवंताला मात्र दोष देत नाही. हा टीकाकार भक्तिमार्गी अर्थात् त्याचे ब्रह्म भगवद्गीतेतील ब्रह्म म्हणजे सगुणब्रह्म होय. या टीकाकाराने 'भक्ति' ही 'ज्ञाना'पेक्षाहि श्रेष्ठ ठरविली. मग ती तो 'कर्मयोगा'पेक्षा श्रेष्ठ का ठरविणार नाही ? पण मौज ही की येथेहि त्याचा दावा टिळकाविरुद्ध आहे. शंकराचार्य व त्यांचे अनुयायी यांच्याविरुद्ध नाही ! मिरजेचे डॉक्टर जोशी यानी इंदुप्रकाशात सुमारे १४/१५ लेख लिहून टीका केली आहे. टिळकाविषयी त्यांची आदबुद्धि निःसंदेह आहे. पण टिळकानी